IREL Recruitment 2024 : ‘या’ सरकारी नोकरीसाठी 10वी, 12वी, ITI पास करु शकतात अर्ज; 88,000 पर्यंत मिळेल पगार

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात (IREL Recruitment 2024) असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. IREL इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ट्रेड्समन ट्रेनी (ITI) पदाच्या एकूण 67 जागा या माध्यमातून भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे.

या माध्यमातून 10 वी, 12 वी पास तसेच ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे. येथे निवड झाल्यास उमेदवारांना दरमहा 22 हजार ते 88 हजार एवढा पगार मिळू शकतो. त्यामुळे उमेदवारांनी वेळेत अर्ज करुन या संधीचा फायदा घ्यायचा आहे.

संस्था – IREL इंडिया लिमिटेडमध्ये
भरले जाणारे पद – ट्रेड्समन ट्रेनी (ITI)
पद संख्या – 67 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 10वी, 12वी +ITI/NAC पास
वय मर्यादा – (IREL Recruitment 2024)
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 मार्च 2024 रोजी 35 वर्षांपर्यंत असावे
2. SC/ST: 05 वर्षे सूट (IREL Recruitment 2024)
3. OBC: 03 वर्षे सूट
परीक्षा फी –
जनरल/ओबीसी/EWS – ₹500/-
SC/ST/PWD/ExSM/महिला – फी नाही
मिळणारे वेतन – 22000/- ते 88000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स – (IREL Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.irel.co.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com