IRCTC Recruitment 2023 : टुरिझमची आवड आहे? आता थेट द्या मुलाखत; इंडियन रेल्वेत सरकारी नोकरी; 35,000 पगार

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम (IRCTC Recruitment 2023) कॉर्पोरेशन लिमिटेड पश्चिम विभाग येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पर्यटन मॉनिटर्स (Tourism Monitors) या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपास्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 11 जुलै 2023 निश्चित करण्यात आली आहे.

संस्था – इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड पश्चिम विभाग
भरले जाणारे पद – पर्यटन मॉनिटर्स (Tourism Monitors)
पद संख्या – 05 पदे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 11 जुलै 2023
मुलाखतीचा पत्ता – इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (IHM) IHMCTAN, वीर सावरकर मार्ग, दादर (प), मुंबई 400 028

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (IRCTC Recruitment 2023)
1. उमेदवारांकडे पर्यटन क्षेत्रातील 3 वर्षांची बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे.
2. तसंच कोणत्याही प्रवाहात 3-वर्षांची बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे.
3. ट्रॅव्हल अँड टुरिझममधील 1-वर्षाचा डिप्लोमा किंवा कोणत्याही प्रवाहात 3-वर्षांची बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे.
मिळणारे वेतन – 35,000/- रुपये दरमहा
आवश्यक कागदपत्रे –
1. Resume (IRCTC Recruitment 2023)
2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
3. शाळा सोडल्याचा दाखला
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स – (IRCTC Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.irctc.co.in/nget/train-search
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com