करिअरनामा ऑनलाईन । कठोर संघर्षातून इतिहास घडत असतो. प्रत्येक (IPS Success Story) यशोगाथेतून नवीन ऊर्जा मिळत असते. IPS अधिकारी पूनम दलाल दहिया यांची कहाणी देखील लाखो तरुणांना प्रेरणा देणारी आहे. त्यांचे कुटुंब हरियाणातील झज्जर येथील आहे. त्यांचा जन्म दिल्लीत झाला असला तरी त्यांचे शिक्षणही तेथूनच झाले आहे. बारावी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी 2 वर्षांचा जेबीटी कोर्स (ज्युनियर बेसिक ट्रेनिंग) पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी रोहिणीच्या एमसीडी शाळेत 2 वर्षे शिक्षिका म्हणून काम केले. नोकरीसोबतच त्यांनी दिल्ली विद्यापीठातून ग्रॅज्युएशनही केले.
2007 मध्ये विवाहबद्ध
2007 मध्ये पूनम दलाल दहिया यांचे लग्न नवी दिल्लीच्या कस्टम एक्साइज विभागात काम करणाऱ्या असीम दहियांशी झाले. त्यांच्या पतीने पूनम यांना करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी खूप साथ दिली. 2009 मध्ये UPSC परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात यश मिळवल्यानंतर त्यांना रेल्वे विभाग (RPF) मिळाला. मात्र त्यांनी यामध्ये सहभागी न होता पुढच्या परीक्षेची तयारी सुरू ठेवली. 2010 साली त्यांना पुन्हा दुसऱ्या प्रयत्नात (IPS Success Story) रेल्वे खाते मिळाले. यावेळी IRPS रँक मिळाला.
एक ना अनेक सरकारी परीक्षा केल्या पास
दरम्यान 2011 मध्ये पूनम दलाल दहिया यांनी हरियाणा PSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि हरियाणा पोलिसात उपअधीक्षक म्हणून त्या रुजू झाल्या. यासोबतच त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारीही सुरू ठेवली. 2011 च्या प्रयत्नात त्या UPSC प्रिलिम्स परीक्षा देखील उत्तीर्ण होऊ शकल्या नाहीत. हा त्यांच्यासाठी शेवटचा प्रयत्न होता.
केंद्र सरकारने 2011 च्या यूपीएससी परीक्षेस बसलेल्या सर्व उमेदवारांना आणखी एक संधी दिली होती. वास्तविक 2011 मध्ये यूपीएससी परीक्षेचा पॅटर्न बदलल्यामुळे उमेदवारांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. यानंतर अनेक उमेदवारांनी याचिका दाखल केल्या होत्या. पूनम यांनी या संधीचा फायदा करुन घेतला.
गरोदरपणात लिहला पेपर (IPS Success Story)
2015 मध्ये वयाच्या 33 व्या वर्षी पूनम दलाल दहिया यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. यामध्ये त्यांना प्रिलिम्स परीक्षेत 275 गुण मिळाले. तेव्हा त्या 9 महिन्यांच्या गरोदर होत्या. यूपीएससी मुख्य परीक्षेच्या वेळी त्यांचे मूल अडीच ते तीन महिन्यांचे होते. यामध्ये त्यांनी 897 गुणांसह 308 वा क्रमांक मिळवला. सध्या त्या हरियाणा पोलिसात ASP म्हणून कार्यरत आहेत.
लिहली 2 पुस्तके
पूनम दलाल दहिया यांनी 2 पुस्तके लिहिली आहेत. पहिल्याचे (IPS Success Story) शीर्षक ‘प्राचीन आणि मध्ययुगीन भारत’ आणि दुसरे ‘आधुनिक भारत’ अशी या पुस्तकांची नावे आहेत. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते मॉडर्न इंडिया पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com