IPS Success Story : ‘या’ दोन ओळींनी दिली प्रेरणा; IPS अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यांच्या यशाचं रहस्य

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्राला प्रशासकीय अधिकाऱ्यांची फार (IPS Success Story) मोठी परंपरा लाभली आहे. महाराष्ट्रातील, मराठी मातीत जन्माला आलेल्या अनेक अधिकाऱ्यांनी संपूर्ण देशात आपल्या राज्याचे नाव मोठे केले आहे. अशाच एका अधिकाऱ्याच्या कामगिरीविषयी आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया मराठी मातीत जन्माला आलेले आयपीएस अधिकारी गिरीश यादव यांच्याबाबत.

ग्रामीण भागातून घेतले शालेय शिक्षण 

गिरीश यादव यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण हे कराडमधील तांबवे या गावी मराठी माध्यमातून झाले आहे. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातून पूर्ण केले. पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विषयात बीटेकची पदवी घेतली.

हार्डवर्क तुम्हाला पुढे नेईल (IPS Success Story)

गिरीश यादव यांनी UPSC परिक्षा देत अवघ्या तिसऱ्याच प्रयत्नात आयपीएस रँक मिळवली. सध्या ते तामिळनाडू राज्यात सेवा बजावत आहेत. ते सांगतात की, यूपीएससी करताना स्पर्धा खूप आहे. कदाचित विद्यार्थ्यांना अपयशही मिळू शकते. त्यामुळे काही वेळा विद्यार्थी हा तणावात जातो. विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्यासाठी ते सांगतात; “काहीवेळा तुमच्या आयुष्यात काही गोष्टी घडतात तिथून तुमचं आयुष्य बदलून जातं. त्याला तुम्ही माईलस्टोन म्हणू शकतात. मी जरी ग्रामीण भागातून आलो तरी हार्डवर्क, मेहनत केली तर प्रत्येकजण ध्येय गाठण्यासाठी पुढे जाऊ शकतो.”

‘Plan B’ ठेवा तयार 

स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना IPS अधिकारी (IPS Success Story) गिरीश यादव सांगतात की, स्पर्धा परिक्षा देणाऱ्या उमेदवाराने आयुष्यात Plan B नेहमी तयार ठेवला पाहिजे कारण एक गोष्ट तुम्हाला जमली नाही तर जे तुम्हाला जमतं त्याकडे तुम्ही वळू  शकता.

‘फैझ अहमद फैझ’ यांनी दिली प्रेरणा

स्पर्धा परिक्षा देताना कधीकधी व्यक्ती हा तणावात जातो. कारण काही जण पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होतात तर काही जण तिसऱ्या, चौथ्या प्रयत्नापर्यंत यश मिळवतात. अशावेळी (IPS Success Story) तणाव येणं साहजिक आहे. यावर बोलताना गिरीश यादव सांगतात; ” अभ्यास करताना अनेकवेळा ताण – तणावाला सामोरे जावे लागले. यावर उपाय म्हणून मी ज्याठिकाणी अभ्यास करायचो त्याठिकाणी ‘फैझ अहमद फैझ’ यांचा शेर लिहून ठेवला होता. तो असा की,

‘दिल ना-उमीद तो नहीं नाकाम ही तो है

लम्बी है ग़म की शाम मगर शाम ही तो है|

या ओळी वाचल्या की मला प्रेरणा  मिळायची आणि मी पुनः जोमाने तयारी करायचो.” त्यामुळे विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुन्हा जोमाने प्रयत्न करावेत असा सल्ला ते देतात.

इतिहासाची प्रचंड आवड 

“शालेय जीवनापासूनच इतिहास विषयाची आवड असल्याने मी इतिहास हा पर्याय निवडला. काही ऐतिहासिक पुस्तके तसेच चित्रपटांच्या वाचनामुळे ही आवड कायम आहे;” असे ते सांगतात.

विद्यार्थ्यांना दिल्या अभ्यासाच्या टिप्स

“2016 मधील माझ्या पहिल्या प्रयत्नात मी संपूर्ण 2 महिने ऐच्छिक पूर्वतयारीसाठी दिले होते. कारण मी पहिल्यांदाच इतिहास हा विषय घेतला होता. लागोपाठच्या प्रयत्नांत या विषयाला दिलेला वेळ कमी झाला. यानंतर मी मुख्यतः प्रिलिम्स आणि मेन्सच्या दरम्यानच्या दिवसांमध्ये इतिहासाचा अभ्यास केला.

मी इतिहासासाठी दैनंदिन/नियमित उत्तर लिहिण्याचा सराव केलेला नाही. पण प्रिलिम्स आणि मेन परीक्षेच्या दरम्यान अडीच ते तीन महिन्यांच्या कालावधीत, मी आठवड्यातून (IPS Success Story) एकदा विभागीय इतिहास पर्यायी चाचणी सोडवली. तसेच परीक्षेच्या 15 दिवस आधी पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीसाठी एकाच दिवसात पूर्ण चाचणी सोडवली. यामुळे मला माझा वेग, सादरीकरण सुधारण्यात आणि काही महत्त्वाच्या चुका आधीच टाळण्यात मदत झाली;” असेही ते सांगतात.

ते पुढे सांगतात; “वेगळ्या नोट्सऐवजी, माझ्याकडे साइड-मार्जिन नोट्स असायची, ज्यामुळे मी जे काही वाचले आहे ते थोड्या वेळात उजळणी करण्यास मला मदत झाली. तसेच अशा नोट्स असण्याचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्ही काही सब-पॉइंट विसरल्यास लगेच क्रॉस चेकचा संदर्भ घेऊ शकता.”

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com