Income Tax Department Recruitment 2023 : 10वी पास ते ग्रॅज्युएट्सना मोठी संधी; आयकर विभागात भरती सुरु; कोणतीही फी नाही

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी (Income Tax Department Recruitment 2023) करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारच्या आयकर विभागामार्फत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2023 आहे.

विभाग – आयकर विभाग, भारत सरकार
पद संख्या – 59 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑक्टोबर 2023
परीक्षा फी – फी नाही

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1) आयकर निरीक्षक – 2 पदे
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी घेतली असणे आवश्यक.
2) कर सहाय्यक – 26 पदे
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर डिग्री तसेच डेटा एंट्री स्पीड 8000 की डिप्रेशन प्रति तास अवगत असणे आवश्यक.
3) मल्टी-टास्किंग स्टाफ – 31 पदे
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड / कौन्सिलमधून मॅट्रिक किंवा समकक्ष शिक्षण घेतले असणे आवश्यक.

वय मर्यादा – (Income Tax Department Recruitment 2023)
1. आयकर निरीक्षक – 18 ते 30 वर्षे (म्हणजे उमेदवार 2 ऑगस्ट 1993 पूर्वी जन्मलेले नाहीत आणि 1 ऑगस्ट 2005 नंतर नाहीत).
2. कर सहाय्यक/ मल्टी-टास्किंग स्टाफ – 18 ते 27 वर्षे (म्हणजे उमेदवार 2 ऑगस्ट 1996 पूर्वी जन्मलेले नाहीत आणि 1 ऑगस्ट 2005 नंतर नाहीत).
मिळणारे वेतन –
1. आयकर निरीक्षक – 44,900/- ते रु. 1,42,400/- दरमहा
2. कर सहाय्यक – 25,500/- ते रु. 81,100/- दरमहा
3. मल्टी-टास्किंग स्टाफ – 18,000/- ते रु. 56,900/- दरमहा

अशी होईल निवड –
1. उमेदवारांना त्यांच्या ई-मेल आयडीवर (अर्ज फॉर्ममध्ये नमूद केलेल्या) भरती प्रक्रियेसंबंधी (निवड/चाचण्या/परीक्षा इ.) कोणत्याही माहितीबद्दल सूचित केले जाईल.
2. कर सहाय्यकाच्या नियुक्तीच्या संदर्भात, उमेदवारांना डेटा एंट्री स्किल टेस्ट @8000 · की डिप्रेशन प्रति तास, · संबंधित भरती नियमांच्या तरतुदीनुसार पात्र होणे देखील आवश्यक आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – incometaxgujarat.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com