IISER Entrance Test 2024 : विज्ञानात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ‘IISER’ पात्रता परीक्षेसाठी अर्ज सुरु

करिअरनामा ऑनलाईन । विज्ञानात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या (IISER Entrance Test 2024) विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बारावी पास विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी आहे. यावर्षी होणाऱ्या आयसर ॲप्टिट्यूड टेस्टसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेत (IISER) पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाची संधी खुली झाली आहे. विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षण देणाऱ्या संस्थेपैकी Indian Institute of Science Education and Research ही जगप्रसिद्ध संस्था आहे. प्रवेश परिक्षा घेवून पाच वर्षांच्या ड्यूअल डिग्रीसाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. पाहूया अर्ज प्रक्रियेविषयी…

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
या अभ्यासक्रमासाठी 12 वी विज्ञान किंवा समकक्ष परीक्षा किमान ६० टक्के गुणांसह २०२२, २०२३ किंवा २०२४ मध्ये पास झालेले उमेदवार प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.
उपलब्ध जागांची संख्या – (IISER Entrance Test 2024)
बीएस-एमएस प्रोग्रामसाठी एकूण जागा – १९३३
अर्ज करण्याची मुदत – १३ मे २०२४
अर्जात सुधारणा करण्याची मुदत – १६ मे ते १७ मे २०२४
प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची तारीख – १ जून २०२४

प्रवेश परीक्षेची तारीख – ९ जून २०२४
अधिकृत संकेतस्थळ – http://www.iiseradmission.in/
देशात या ठिकाणी आहेत आयसर संस्था – (IISER Entrance Test 2024)
पुणे, बर्हमपूर, भोपाळ, कोलकता,मोहाली, तिरुपती, तिरुअनंतपुरम
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com