IFSCA Recruitment 2024 : आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणात भरती सुरू; दरमहा 89150 रुपये पगार

करिअरनामा ऑनलाईन । पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची (IFSCA Recruitment 2024) उत्तम संधी निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणात ‘सहाय्यक व्यवस्थापक’ पदावर भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 10 पदे भरली जातील. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल 2024 आहे. जाणून घेवूया भरती प्रक्रियेविषयी सविस्तर….

संस्था – आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण
भरले जाणारे पद – सहाय्यक व्यवस्थापक
पद संख्या – 10 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन (IFSCA Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 एप्रिल 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – सांख्यिकी / अर्थशास्त्र / वाणिज्य / व्यवसाय प्रशासन (वित्त) / अर्थमिती या विषयातील विशेषीकरणासह पदव्युत्तर पदवी.
वय मर्यादा –
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01.02.2024 रोजी, 30 वर्षे.
2. SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट
परीक्षा फी – (IFSCA Recruitment 2024)
1. जनरल/ओबीसी /EWS – 1000/- रुपये
2. SC/ ST/PwBD – 100/- रुपये.

मिळणारे वेतन –
1. अ श्रेणीतील अधिकाऱ्यांची वेतनश्रेणी रु. 44500-2500(4)-54500-2850(7)-74450-EB-2850(4)- 85850-3300(1)-89150 (17 वर्षे).
नोकरी करण्याचे ठिकाण – भारतातील किंवा परदेशातील कोणत्याही ठिकाणी जेथे IFSCA ची कार्यालये आहेत तिथे.

काही महत्वाच्या लिंक्स – (IFSCA Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
www.ifsca.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com