ICAI-CA Exam : आता वर्षातून तीन वेळा होणार ICAI-CA परीक्षा

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स (ICAI-CA Exam) ऑफ इंडियाच्या बोर्ड ऑफ स्टडीजने मे-जून, सप्टेंबर आणि जानेवारी महिन्यात वर्षातून तीनदा ICAI-CA परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे संस्थेने आता सप्टेंबर 2024 आणि जानेवारी 2025 च्या CA परीक्षांमध्ये बसण्यासाठी फाउंडेशन आणि इंटरमीडिएट अभ्यासक्रमांमध्ये नावनोंदणीची अंतिम मुदत जाहीर केली आहे.

हे उमेदवार फाउंडेशनसाठी उपस्थित राहण्यास पात्र
नवीन धोरणानुसार ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या महिन्याच्या पहिल्या दिवशी किंवा त्यापूर्वी किमान चार महिन्यांच्या कालावधीसाठी ICAI च्या अभ्यास मंडळामध्ये नोंदणी केली आहे (ICAI-CA Exam) आणि नियम 25F मध्ये निर्दिष्ट केलेल्या अटींची पूर्तता केली आहे. ते उमेदवार फाउंडेशनसाठी उपस्थित राहण्यास पात्र असतील. पात्रता निकषांनुसार सीए फाउंडेशन कोर्स नोंदणीसाठी सप्टेंबर 2024 च्या परीक्षेत बसण्याची अंतिम तारीख 1 मे आहे तसेच सीए इंटरमिजिएट अभ्यासक्रमासाठी जानेवारी 2025 च्या परीक्षेत बसण्यासाठी नोंदणीची तारीख देखील 1 मे आहे.

इथे करा नोंदणी (ICAI-CA Exam)
नोटीसमध्ये म्हटले आहे की, “ज्या विद्यार्थ्यांनी 1 जानेवारी 2024 पर्यंत फाऊंडेशन रूट किंवा थेट इंटरमिजिएट कोर्समध्ये नोंदणी केली आहे. ते सप्टेंबर 2024 इंटरमीडिएट परीक्षेस बसण्यास पात्र आहेत.” उमेदवार अधिकृत वेबसाइट eservices.icai.org द्वारे नोंदणी करु शकतात.

13 ऑक्टोबर 2020 रोजी अधिकाऱ्यांनी चार्टर्ड अकाउंटंट रेग्युलेशन 1988 च्या नियम 25E, 25F आणि 28F मध्ये सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली; त्यानंतर आता उमेदवाराला 10 वी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर फाउंडेशन कोर्ससाठी तात्पुरती नोंदणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com