IBPS Exam : IBPS कडून हॉल तिकिट्स जारी; अशा पद्धतीनं करा Download

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल (IBPS Exam) सिलेक्शन IBPS ने स्पेशालिस्ट ऑफिसर्सच्या (CRP SPL-XII) पूर्व परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी केले आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार त्यांचे प्रवेशपत्र IBPS च्या अधिकृत वेबसाइट ibps.in वर जाऊन डाउनलोड करू शकतात. ही परीक्षा 31 डिसेंबर रोजी होणार आहे.

याशिवाय, उमेदवार https://ibpsonline.ibps.in/crpsoxioct22 या लिंकवर क्लिक करून IBPS SO 2022 चे प्रवेशपत्र थेट डाउनलोड करू शकतात. तसेच, खाली दिलेल्या या चरणांद्वारे, तुम्ही IBPS SO अॅडमिट कार्ड 2022 देखील तपासू शकता. ही ऑनलाइन प्रिलिम्स परीक्षा 125 गुणांची (IBPS Exam) असेल, ज्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातील. परीक्षेचा कालावधी 2 तासांचा असेल ज्यामध्ये बँकिंग इंडस्ट्री, इंग्रजी भाषा, तर्क आणि सामान्य जागरूकता यांच्या विशेष संदर्भासह 3 विभाग असतील.

असं डाउनलोड करा हॉल तिकिट – (IBPS Exam)

  1. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाइट ibps.in वर जा.
  2. वेबसाइटच्या होम पेजवर, CRP RRBs वर क्लिक करा.
  3. आता IBPS स्पेशालिस्ट ऑफिसर SO XII भर्ती 2022 अॅडमिट कार्डच्या लिंकवर जा.
  4. इथे Download Hall Ticket या लिंकवर क्लिक करा.
  5. आता उमेदवारांना त्यांचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाकावा लागेल.
  6. सबमिशन केल्यावर, प्रवेशपत्र स्क्रीनवर उघडेल.
  7. प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि पुढील वापरासाठी प्रिंट आउट घ्या.

या रिक्त पदांद्वारे, आयटी अधिकारी, राजभाषा (IBPS Exam) अधिकारी, कायदा अधिकारी आणि विपणन अधिकारी या पदांवर भरती केली जाईल. परीक्षेसाठी जारी केलेल्या प्रवेशपत्रावर उमेदवारांचे नाव, पालकांचे नाव, परीक्षेची तारीख, परीक्षेचे ठिकाण, फोटो आणि स्वाक्षरी दिली जाईल. हे तपशील तपासल्यानंतरच प्रवेशपत्रासह परीक्षा केंद्रावर जा.

असं आहे परीक्षेचं पॅटर्न –

IBPS SO प्रिलिम्स परीक्षा दोन तासांची असते आणि ती (IBPS Exam) ऑनलाइन घेतली जाते. यात एकूण 150 प्रश्न आणि जास्तीत जास्त 125 गुणांसह 3 विभाग असतात, IBPS SO पूर्व परीक्षेत नकारात्मक मार्किंग असते कारण प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण कापले जातात.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com