करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS Clerk Admit Card 2024) CRP Clerks XIV साठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. IBPS ने राष्ट्रीय बँकांमधील लिपिक संवर्गाच्या 6 हजारापेक्षा अधिक पदांसाठी भरतीचे नियोजन केले आहे. त्यासंदर्भात निवड प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यातील प्राथमिक परीक्षेला बसण्यासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे हॉल तिकीट प्रसिद्ध करण्यात आले आहे. IBPS ने अधिकृत वेबसाइट ibps.in वर क्लर्क ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी लिंक सक्रिय केली आहे.
IBPS ने क्लर्कच्या प्राथमिक परीक्षेच्या तारखा यापुर्वी (IBPS Clerk Admit Card 2024) जाहीर केल्या आहेत. अधिसूचनेनुसार, ऑनलाइन प्रिलिम्स परीक्षा २४, २५ आणि ३१ ऑगस्ट रोजी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये घेतली जाईल. उमेदवारांना देण्यात आलेल्या परीक्षेचे शहर आणि केंद्र तसेच IBPS द्वारे प्रसिद्ध केलेल्या प्रवेशपत्रावर परीक्षेची तारीख आणि शिफ्टची माहिती देण्यात आली आहे.
असं डाउनलोड करा ॲडमिट कार्ड (IBPS Clerk Admit Card 2024) –
1. ज्या उमेदवारांनी IBPS लिपिक परीक्षा 2024 साठी अर्ज केला आहे. त्यांनी पहिल्या टप्प्यातील प्रिलिम्समध्ये उपस्थित राहण्यासाठी त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाइट ibps.in ला भेट द्यावी.
2. यानंतर, उमेदवार होम पेजवर दिलेल्या लिंकवरून प्रवेशपत्र डाउनलोड पृष्ठावर जाऊ शकतात.
3. या पृष्ठावर, उमेदवार त्यांचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख तपशील भरून आणि सबमिट करून त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com