IAS Surabhi Gautam : जिच्या इंग्रजीची थट्टा उडवली गेली तिनेच ISRO, BARC आणि UPSC मध्ये टॉप येवून दाखवलं!!

IAS Surabhi Gautam
IAS Surabhi Gautam
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करियरनामा ऑनलाईन। (IAS Surabhi Gautam) MPSC – UPSC परीक्षा देणं, अधिकारी होण आणि देशाची सेवा करणं अशी स्वप्न पाहणारी आजची तरुण मंडळी. पण हे स्वप्न प्रत्येकाकडून पूर्ण होईलच असे नाही जो या स्पर्धेत जीवतोडून मेहनत घेण्यासाठी तत्पर असतो आणि कितीही संघर्ष असला तरी हार न स्वीकारण हे ज्यांना जमत ते शेवटपर्यंत या स्पर्धेत टिकून राहतात. अशीच एक तरुणी एका छोट्याश्या गावातून आपल शिक्षण पूर्ण करते, (IAS Surabhi Gautam) कॉलेज जीवनात इंग्लिश भाषा न आल्यामुळे एका वेगळ्या संघर्षाला सामोरे जाते, त्यांनंतर कुठल्याच परीक्षेत ती नापास न होण्याच प्रण करते आणि प्रत्येक परीक्षेत मेरिट लिस्ट मध्ये तीच नाव असतं. कधीही मागे वळून न पाहणारी सुरभि गौतम देशाच्या सर्वात कठीण परीक्षा UPSC पास करून AIR 50 मिळवते, तिचा प्रेरणादायी प्रवास नेमका तिने कसा केला तेच आजच्या या स्पेशल स्टोरीतून जाणून घेवूयात.

सुरभि चे बालपण आणि शैक्षणिक प्रवास –

सुरभि गौतमचे वडील मध्य प्रदेशातील मैहर कोर्टमध्ये वकील आहेत, तर तिची आई डॉ. सुशीला गौतम हायस्कूलमध्ये शिक्षिका आहेत. सुरभिने आपल शालेय शिक्षण गावातील एका सरकारी शाळेत पूर्ण केलं, जिथे अगदी कमी सुविधा असूनही तिने तिचे शिक्षण मन लावून पूर्ण केले. तिने हिंदी माध्यामतून संपूर्ण शालेय शिक्षण पूर्ण केले होते.

सुरभिने 10वी च्या परीक्षेत 93.4% गुणांसह उत्तीर्ण झाली. विशेष म्हणजे तिने गणित आणि विज्ञान मध्ये 100-100 गुण मिळविले होते. सुरभिने आपल्या या चांगल्या गुणांमुळे 10 वी आणि 12 वी मध्ये राज्याच्या मेरिट लिस्टमध्ये स्थान मिळवले होते. (IAS Surabhi Gautam)

सुरभि 12 वी मध्ये शिकत असताना तिला ‘रुमॅटिक फीव्हरचीही’ झुंज द्यावी लागली, ज्यामुळे ती प्रत्येक 15 दिवसांनी आपल्या आई-वडिलांसोबत गावाहून 150 किलोमीटर उपचारासाठी जबलपूरला जात होती. या सगळ्या अडचणींनंतरही तिने आपल्या अभ्यासाकडे दुर्लक्ष केल नाही.

सुरभि ने 12 वी पूर्ण केल्यानंतर राज्य इंजिनियरिंग प्रवेश परीक्षा देखील चांगल्या गुणांसह पास केली. तिने भोपालच्या एका इंजिनियरिंग कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनियरिंगमध्ये प्रवेश घेतला. (IAS Surabhi Gautam)

कॉलेज जीवनातील संघर्ष –

मात्र जेव्हा सुरभि कॉलेज मध्ये प्रवेश घेते तेव्हा ते संपूर्ण शिक्षण इंग्लिश माध्यमातून असते. इथे मात्र सुरुवातीला तिला इंग्रजी मधून शिक्षण घेताना खूप त्रास झाला. इंग्रजी न आल्यामुळे तिचा उपहास देखील केला गेला पण तिने त्यातूनही मार्ग काडला. त्यावेळी सुरभि ने इंग्रजी सुधारण्यासाठी स्वतःहून इंग्रजीत बोलायला सुरुवात केली आणि दररोज किमान 10 शब्दांचे अर्थ शिकायचे, त्याचे अर्थ भिंतीवर लिहायचे आणि त्यांना दिवसातून अनेक वेळा बोलण्याचा सराव करत होती. असं करत तिने इंग्रजी भाषेत प्रभुत्व मिळविले.

सुरभि ने कॉलेज प्रचंड मेहनत घेतली याचा परिणाम असा झाला की सुरभि ने आपल्या ग्रॅज्युएशनच्या पहिल्या सेमिस्टरमध्ये टॉप केले आणि तिला ‘कॉलेज चांसलर पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. ती नेहमीच लक्ष केंद्रित करत होती आणि आपल्या स्वप्नांना साध्य करण्यासाठी कडक मेहनत घेत होती.
इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुरभीला कॉलेज प्लेसमेंटच्या माध्यमातून टीसीएसमध्ये नोकरी मिळाली. (IAS Surabhi Gautam)

IAS सुरभि गौतम –

सुरभिला सिव्हिल सर्व्हिसेसची इच्छा असल्यामुळे तिने नोकरीमध्येच अर्धवट थांबवली. त्यानंतर ती अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी झाली. यावेळी, तिला इस्रो, बीएआरसी, जीटीई, एमपीपीएससी, सेल, एफसीआय, एसएससी आणि दिल्ली पोलिस अशा स्पर्धा परीक्षांसाठी निवडले गेले.

सुरभि ला 2013 मध्ये IES सेवा परीक्षेसाठीही निवडले गेले होते आणि या परीक्षेत तिला ऑल इंडिया लेव्हलवर पहिलं स्थान मिळाल होतं. त्यांनंतर 2016 मध्ये, तिने UPSC परीक्षा देखील पास केली आणि IAS अधिकारी होऊन दाखवल.

अखेर तिने खडतर प्रवास करूनही अधिकारी होऊन दाखवल आणि अनेक तरुणांसाठी आदर्श बनली.

हे पण वाचा – Indian Army Agniveer Recruitment 2025 : अग्निवीर भरतीच्या अर्जप्रक्रियेत मोठे बदल; तरुणांवर काय परिणाम होणार?