करिअरनामा ऑनलाईन । भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल होण्याचं (IAS Success Story) स्वप्न अनेकवेळा सत्यात उतरतं तर अनेक जणांना या ध्येयापासून वंचित राहावं लागतं. UPSC ची परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. त्यामुळे या परीक्षेत यशस्वी होण्याचं प्रमाण तुलनेनं कमी असतं. जे युवक-युवती ही परीक्षा उत्तीर्ण होतात. त्यांचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास नक्कीच खडतर आणि इतरांसाठी प्रेरणादायी असतो. आज आम्ही तुम्हाला कठोर परिश्रम घेत जिद्दीनं UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन जिल्हाधिकारी बनलेल्या एका तरुणाच्या प्रवासाविषयी सांगणार आहोत.
स्टेशनवर केली हमाली (IAS Success Story)
हा युवक रेल्वे स्टेशनवर कुली अर्थात हमालाचे काम करत होता. पण कष्टाच्या जोरावर त्याने केरळ लोकसेवा आयोगाची परीक्षा आणि आयएएस परीक्षेत घवघवीत यश मिळवलं. जवळ पैसे नसल्याने पुस्तक घेऊ न शकलेला हा युवक रेल्वे स्टेशनवरील फ्री वाय-फायच्या (IAS Success Story) मदतीने अभ्यास करून KPSC आणि KAS परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. आपल्याला सरकारी नोकरीच करायची आहे हे त्याचं स्वप्न त्याने अत्यंत मेहनतीनं पूर्ण केलं आहे. या तरुणाचा IAS पदापर्यंत पोहचण्याचा प्रवास निश्चितच सुखकर नव्हता.
फ्री Wi Fi च्या मदतीने केला अभ्यास
भारतीय प्रशासकीय सेवेत जाणं हे एक दिव्यच समजलं जातं. केरळ येथील हमाली करणाऱ्या तरुणाने केरळ लोकसेवा आयोग परीक्षेत उत्तीर्ण होण्यात तसेच IAS होवून स्वतःचे स्थान निर्माण करण्यात यश मिळवले आहे. श्रीनाथ के. असं या युवकाचं नाव. रेल्वे स्टेशनवर हमालीचे काम करताना तेथे उपलब्ध असलेल्या फ्री Wi Fi च्या मदतीने सरकारी परिक्षेत त्याने यश मिळवलं (IAS Success Story) आहे. मुन्नार येथील रहिवासी असलेल्या श्रीनाथनं कोचीन रेल्वे स्टेशनवर कधीकाळी हमाल म्हणून काम केलं आहे. स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी चांगल्या आयुष्याची आकांक्षा बाळगून श्रीनाथने सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अभ्यास सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय योग्य करुन दाखवला.
अन् अधिकारी होण्याचं ठरवलं
श्रीनाथ के. हा रेल्वे स्टेशनवर हमाल म्हणून काम करत होता. पण हमालीतून मिळणारं उत्पन्न कुटुंबाच्या पालन पोषणासाठी पुरेसं नव्हतं. घरच्या बिकट (IAS Success Story) परिस्थितीची झळ तीव्र होत होती. त्यावेळी त्याच्या पदरात एक वर्षाची मुलगी होती. मुलीचं भविष्य चांगलं असावं या विचारानं त्याने अजून काही चांगल्या गोष्टी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी 2018 मध्ये त्याने सरकारी परीक्षा देवून अधिकारी होण्याचा निर्णय घेतला.
स्मार्टफोन, मेमरी कार्ड आणि ईयरफोन वर केला अभ्यास
काम आणि जबाबदारीमुळे श्रीनाथला अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळत नव्हता. 2016 मध्ये Airtel आणि Google ने भारतातील अनेक रेल्वे स्थानकांवर (IAS Success Story) फ्री वाय-फाय सुविधा सुरू केली. या सुविधेमुळे श्रीनाथला काम करताना अभ्यास करणं सोपं झालं. UPSC अभ्यासासंदर्भात Audiobook आणि व्हिडिओ डाउनलोड करून त्याने रेल्वे स्टेशनवर काम करत करत केपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे बहुतांश विद्यार्थी कोचिंग क्लास, एक्स्ट्रा क्लास, अभ्यासाच्या पुस्तकांवर मोठा खर्च करतात. याउलट श्रीनाथने त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या पैशातून मेमरी कार्ड, स्मार्टफोन आणि ईयरफोन खरेदी केले. तयारी पूर्ण झाल्यावर त्याने ग्राम सहाय्यक पदासाठी केरळ लोकसेवा परीक्षेसाठी अर्ज भरला. या परीक्षेत त्याला 82 टक्के गुण मिळाले. श्रीनाथनची (IAS Success Story) संपूर्ण कहाणी गुगल इंडियाने शेअर केली तेव्हा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी 2018 मध्ये त्याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे कौतुक केले. त्यानंतर श्रीनाथने यूपीएससी नागरी सेवा परीक्षा दिली आणि यूपीएससी सीएसईमध्ये तो चौथ्या प्रयत्नात यशस्वी झाला. यानंतर तो आयएएस अधिकारी बनला. रेल्वे स्टेशनवर हमालीचे काम करणारा श्रीनाथ के. कोणत्याही कोचिंग क्लास शिवाय IAS ऑफिसर झाला. हमाली करून उच्च पदस्थ अधिकारी पदापर्यंत पोहचणाऱ्या श्रीनाथ के. या होतकरू तरुणाचा खडतर प्रवास तमाम तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com