करिअरनामा ऑनलाईन । सतत प्रयत्न करणारे कधीच हार (IAS Success Story) मानत नाहीत. एखाद्या व्यक्तिमध्ये संयम, धैर्य आणि कष्ट करण्याची जिद्द असेल तर तो काहीही करू शकतो. ओसाड जमिनीवर सोने उगवण्यापासून करोडो रुपयांची कंपनी स्थापन करण्यापर्यंत जिद्दी व्यक्ति काहीही करु शकते. केंद्रीय लोकसेवा आयोगाची अती कठीण परीक्षा पास होण्यासाठी देशातील लाखो तरुण दिवस रात्र मेहनत घेत असतात. अशाच एका जिद्दी तरुणाची कथा आज आपण वाचणार आहोत.
आपल्या देशात काही लोकांमध्ये अशी मानसिकता पहायला मिळते की एखादा व्यक्ती अपयशी ठरला तर तो आयुष्यात काहीच करू शकत नाही. अनेकवेळा विद्यार्थी नापास झाला तर त्याचे भविष्य (IAS Success Story) अंधारात भरले जाईल असे पालक व नातेवाईक सांगतात. नाहीतर तो छोटी मोठी नोकरी करून उदरनिर्वाह करेल. या विचारसरणीला अपवाद ठरले आहेत IAS ऑफिसर विजय वर्धन. विजय वर्धन 1-2 वेळा नव्हे तर तब्बल 35 वेळा परीक्षेमध्ये नापास झाले आहेत.
कोण आहेत IAS विजय वर्धन? (IAS Success Story)
आयएएस विजय वर्धन हे मूळचे हरियाणातील सिरसा येथील आहेत. त्यांनी शालेय शिक्षण सिरसा येथूनच पूर्ण केले आहे. शालेय शिक्षणानंतर त्यांनी हिसार येथील कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक केले. अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर ते यूपीएससीच्या तयारीसाठी दिल्लीला गेले.
एक दोन नव्हे चक्क 35 परीक्षांमध्ये नापास
IAS सारखी परीक्षा उत्तीर्ण होणे सोपे नाही. हरियाणाचा विजय वर्धन हा तरुण स्पर्धा परीक्षेच्या तयारीत गुंतला होता. एका रिपोर्टनुसार विजय वर्धन जवळपास 35 स्पर्धा परीक्षांमध्ये नापास झाले होते. त्यांनी हरियाणा PSC, UPPSC, SSC, CGL सारख्या अनेक स्पर्धात्मक परीक्षा दिल्या आहेत.
UPSCमध्ये वारंवार नापास
विशेष म्हणजे वारंवार अपयश येऊनही त्यांची हिंमत खचली नाही. दु:खी होण्याऐवजी ते नेहमी आपल्या अपयशातून शिकत राहिले. विजय वर्धन यांनी 2014 मध्ये (IAS Success Story) पहिल्यांदा UPSC ची परीक्षा दिली. पूर्व परीक्षा पास केली पण मुख्य परिक्षेत अपयश आले. 2015 मध्येही असेच घडले होते. यावेळी मात्र त्यांनी परीक्षेच्या तयारीची पद्धत बदलली. 2017 मध्ये विजयने पुन्हा परीक्षा दिली पण यावेळी त्यांना मुलाखतीच्या फेरीत पास होता आले नाही.
अखेर 2018 मध्ये UPSC पास
विजय यांच्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्या कडून यश मिळण्याची आशा सोडली होती; पण विजयला एक दिवस यश मिळेल याची खात्री होती. अखेर 2018 मध्ये त्यांना त्यांच्या संयमाचे फळ मिळाले. त्यांनी UPSC मध्ये AIR 104 रँक मिळवली आणि ते IPS झाले. विशेष म्हणजे त्यांना फक्त (IAS Success Story) आयएएस व्हायचे होते. 2021 मध्ये त्यांनी पुन्हा परीक्षा दिली आणि अखेर त्यांचे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले. आयएएस विजय वर्धन उमेदवारांना सल्ला देताना म्हणतात; “केवळ विद्यार्थीच त्याचा सर्वोत्तम शिक्षक होऊ शकतो. प्रत्येकाने आपल्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवला पाहिजे.” विजय यांनी केलेल्या सतत्यपूर्ण प्रयत्नामुळे असा बोध घेता येतो; की आयुष्यात कितीही वेळा अपयश आलं तरी धीर न सोडता आपल्याला ध्येयापर्यंत वाटचाल करत राहिलंच पाहिजे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com