करिअरनामा ऑनलाईन। जीवनात प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अडचणी येत (IAS Success Story) असतात. या अडचणींवर मात करत जी व्यक्ती यश मिळवते ती खरी विजेता ठरते. तसं पाहायला गेलं तर संघर्षाचा ठराविक काळ असतो, परंतु आयएएस झालेल्या उम्मुल खेर यांच्या आयुष्यात संघर्षाशिवाय दुसरं काहीचं नव्हतं. पण त्यांनी कलेक्टर होण्याचं उराशी बाळगलेलं स्वप्न इतकं मोठ होतं की, त्याच्यासमोर उम्मुल यांनी कशाचीही तमा बाळगली नाही. बालपणापासून दिव्यांग असताना झोपडपट्टीत राहून शिक्षण घेतलं, कुटुंबापासून त्या दुरावल्या गेल्या, शरीरावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या. तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही अन् IAS होऊनच यशाला गवसणी घातली. उम्मुल यांची यशोगाथा खरोखरच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
राजस्थानच्या पाली येथील रहिवासी
उम्मुल या राजस्थानच्या पाली येथील रहिवासी आहेत. बालपणापासून (IAS Success Story) त्या दिव्यांग होत्या. एक काळ असा होता, की त्यांचं कुटुंब त्यांच्यापासून दूर झालं. पण त्या घाबरल्या नाहीत. त्यांनी स्वत:चा मार्ग निवडला व त्यात आलेले अडथळेही त्यांनी स्वत: पार केले आणि यूपीएससी परीक्षेत यश मिळवलं. अनेक फ्रॅक्चर आणि शस्त्रक्रिया झाल्या, पण उम्मुल यांनी थांबण्याचं नाव घेतलं नाही.
16 फ्रॅक्चर आणि 8 शस्त्रक्रिया
उम्मुल या राजस्थानच्या पालीतील एका गरीब मारवाडी कुटुंबातील आहेत. त्यांना ‘बोन फ्रजाईल डिसऑर्डर’ हा आजार आहे. यात शरीरातील हाडं कमकुवत बनतात. उम्मुल यांच्या हाडात नेहमी फ्रॅक्चर होत असे. उम्मुल यांना आतापर्यंत 16 वेळा फ्रॅक्चर आणि 8 शस्त्रक्रियांना सामोरे जावं लागलं.
राहतं घर अचानक सोडावं लागलं (IAS Success Story)
उम्मुल यांच्या कुटुंबात आई-वडिल आणि तीन भाऊ-बहिण आहेत. उम्मुल लहान असताना त्यांचे वडिल कुटुंबासह दिल्लीतील निझामुद्दीन भागात झोपडपट्टीत राहत होते. कुटुंब चालवण्यासाठी ते गाडीवर कपडे विकत असत. त्यावेळी सरकारच्या आदेशानं झोपडपट्टी जमीनदोस्त करण्यात आली. त्यानंतर हे कुटुंब त्रिलोकपुरी झोपडपट्टीत राहायला आलं.
एकटं राहण्याचा घेतला निर्णय
उम्मुल खेर यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती हालाखीची होती. कुटुंबाला हातभार लागावा म्हणून त्यांनी सातवीत असतानाच ट्युशन घेणं सुरू केलं. नववीत असताना (IAS Success Story) त्यांच्या आईच निधन झालं व वडिलांनी दुसर लग्न केलं. उम्मुलनी शाळेत जाणं हे त्यांच्या सावत्र आईला पसंत नव्हतं. परंतु कुठल्याही स्थितीत शिक्षण सोडणं त्यांना मान्य नव्हतं म्हणून त्यांनी कुटुंबच सोडलं आणि त्या एकट्या राहू लागल्या.
शालेय जीवनात केले एक ना अनेक विक्रम
उम्मुल यांना दहावीत 91 टक्के आणि बारावीत 90 टक्के गुण मिळाले. त्यांनी दिल्ली विद्यापीठातील गार्गी महाविद्यालयातून मानसशास्त्र म्हणजेच सायकॉलॉजीमध्ये पदवी घेतली. त्यानंतर जेएनयूमधून इंटरनॅशनल स्टडिज स्कूलमधून एम.ए आणि एम फिलचा अभ्यासक्रम पूर्ण केला. 2014 मध्ये जपानच्या इंटरनॅशनल लीडरशिप ट्रेनिंग प्रोग्रॅमसाठी त्यांची निवड झाली. 18 वर्षांतील इतिहासात अशी निवड होणाऱ्यांमध्ये उम्मुल एकमेव भारतीय होत्या. एम फिलनंतर उम्मुल जेआरएफ उतीर्ण झाल्या. इथूनच त्यांची आर्थिक स्थिती बळकट व्हायला लागली.
समाजासमोर निर्माण केला आदर्श
उम्मुल यांनी त्यांच्या आयुष्यात फक्त आर्थिक अडचणींचाच सामना केला नाही तर त्यांच्या कुटुंबापासून त्यांना दूरही व्हावं लागलं. परंतु, त्यांनी परिस्थितीसमोर पराभव न मानता स्वत:चा मार्ग स्वत: निवडला व आयएएस होऊन समाजासमोर एक प्रेरणा निर्माण केली. जेआएफ करत असतानाच त्यांनी (IAS Success Story) यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली होती. सीएसई 2016 परीक्षेत त्यांनी पहिल्याच प्रयत्नात 420 वी रँक मिळवली. सामाजिक कार्य आणि लोकांच्या अडचणी सोडवण्याचे स्वप्न स्वप्न नागरी सेवा परीक्षेद्वारे साकार होईल असे त्या म्हणतात.
IAS Topper Marks
UPSC परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात उम्मुल खेर यांनी घवघवीत यश मिळवलं आहे. त्यांनी संपूर्ण भारतातून 420 वी रॅंक घेतली आहे. त्यांनी मिळवलेल्या मार्कवर एक नजर टाकूया..
Written Total | 795 |
Interview | 206 |
Final Total | 1001 |
Ummul Kher Facts (IAS Success Story)
Rank: 420
CSE: 2016
Attempt: First
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com