IAS Success Story : IIT मधून इंजिनियरिंग; विना कोचिंग इंटरनेटवरुन अभ्यास; दुसऱ्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; कोण आहेत तेजस्वी राणा?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (IAS Success Story) परीक्षेसाठी तरुण पिढी रात्रंदिवस मेहनत घेत असते. परीक्षेच्या तयारीसाठी ते कोचिंग क्लासचीही मदत घेतात. पण असेही काही उमेदवार आहेत जे कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय स्वतःच नोट्स तयार करतात आणि केवळ परीक्षेत यश मिळवत नाहीत तर चांगली रॅंक देखील मिळवतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका उमेदवाराची कहाणी सांगणार आहोत, ज्या तरुणीने केवळ देशातीलच सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी कोणत्याही कोचिंग क्लासची मदत घेतली नाही. तिने इंटरनेटच्या मदतीने स्वतःच्या नोट्स तयार केल्या आणि UPSC परिक्षेत संपूर्ण भारतातून 12 वी रॅंक मिळवली आहे.

IAS Success Story Tejasvi Rana

IIT मधून इंजिनियरिंग पदवी (IAS Success Story)
हरियाणातील कुरुक्षेत्र येथे राहणाऱ्या तेजस्वी राणा लहानपणापासूनच अभ्यासात हुशार समजल्या जायच्या. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी JEEची परीक्षा दिली. या परीक्षेत चांगले गुण मिळाल्यानंतर त्यांना आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश मिळाला. यानंतर त्यांनी येथून अभियांत्रिकीची पदवी घेतली.

IAS Success Story Tejasvi Rana

इंजिनियरिंग नंतर UPSC
इंजिनियरिंगनंतर तेजस्वी यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. यासाठी त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासचा आधार घेतला नाही. तर त्यांनी ऑनलाइन उपलब्ध असलेल्या (IAS Success Story) अभ्यासाच्या सामग्रीवरून अभ्यास सुरु केला. यादरम्यान त्यांनी स्वतः नोट्स तयार केल्या. दिवसाचे योग्य टाईम टेबल आखून त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली. आपली परीक्षेची तयारी किती झाली आहे हे तपासण्यासाठी त्या सतत मॉक टेस्ट देत असत.

IAS Success Story Tejasvi Rana

पहिल्या प्रयत्नात अपयश
तेजस्वी यांनी पूर्ण तयारीने UPSC सिव्हिल परीक्षा दिली. मात्र पहिल्याच प्रयत्नात त्या नापास झाल्या. त्यांनी पहिल्या प्रयत्नात पूर्व परीक्षा पास केली पण मुख्य परिक्षेत त्यांना (IAS Success Story) अपयश आले.

IAS Success Story Tejasvi Rana

शेवटी यश मिळालच
परिक्षेत एकदा अपयशी ठरल्यानंतर तेजस्वी यांनी आपल्यातील उणिवांवर काम करायला सुरवात केली. त्यांनी स्वतःमधील कमजोरी ओळखून चुका सुधारण्याचा (IAS Success Story) प्रयत्न केला. अभ्यास करत असताना त्या ऑनलाईन मार्गदर्शनही घेत असत. त्या पूर्ण तयारीनिशी पुन्हा परीक्षेला बसल्या. यावेळी त्यांनी परीक्षेत मुसंडी मारली. त्यांनी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तिन्ही टप्प्यात यश मिळवत संपूर्ण भारतात 12 वी रँक मिळवली.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com