IAS Success Story : जिच्या नावामुळे माफियांचा उडतो थरकाप; कोण आहे ही यंग लेडी ऑफिसर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । IAS सोनिया मीना या 2013 बॅचच्या (IAS Success Story) अधिकारी आहेत. सोनिया यांची एक हुशार आणि कुशाग्र अधिकारी म्हणून ओळख कायम आहे. सोनिया नेहमीच तिच्या धडाकेबाज कामांमुळे चर्चेत असते. सोनियाने यूपीएससी परीक्षेत संपूर्ण भारतातून 36 वा क्रमांक पटकावला आणि ती अधिकारी झाली आहे. एक कडक शिस्तीची यंग ऑफिसर म्हणून ती नेहमीच चर्चेत असते. कोणाच्याही विरोधाला न जुमानता तिने केलेल्या कारवायांमुळे माफियांचा नेहमीच थरकाप उडतो.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना बरीच वर्षे घालवावी लागतात. परंतु, सोनिया मीना (IAS Sonia Meena) ही अशा काही उमेदवारांपैकी एक आहे जीने तिच्या सुरुवातीच्या प्रयत्नांमध्ये UPSC नागरी सेवा परीक्षा पास केली. हाती आलेल्या रिपोर्टनुसार, सोनिया मीना 2013 मध्ये UPSC परीक्षा ऑल इंडिया रँक (AIR) 36 सह उत्तीर्ण झाली आणि IAS अधिकारी बनली.

माफियांवरील कारवाईने नांव आले चर्चेत (IAS Success Story)
सोनिया मीना या मूळच्या राजस्थानच्या रहिवासी आहेत. गेल्या 10 वर्षांपासून त्या मध्य प्रदेश केडरमध्ये कार्यरत आहेत. माफिया अर्जुन सिंगच्या तपासाबाबत त्यांनी अनेक बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. आजही ती दबंग आयएएस अधिकारी म्हणून ओळखली जाते. आपल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात IAS सोनिया यांनी अनेक माफियांवर कारवाई केली आहे. सोनियांच्या नावालाच माफिया घाबरतात असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही.

कडक शिस्तीची महिला अधिकारी
IAS सोनिया मीना या त्यांच्या कठोर प्रशासकीय भूमिकेसाठीही ओळखल्या जातात. यामुळेच माफिया जगातील लोक त्यांना खूप घाबरतात. तिची दुसरी बाजू सांगायची झाली तर सोनिया सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ती तरुण उमेदवारांना प्रोत्साहित करण्यासाठी इन्स्टाग्रामवर प्रेरक व्हिडिओ शेअर करत असते. प्रशासकीय सेवेची तयारी करणाऱ्यांना ती नेहमीच प्रेरित करते आणि तिच्या सरकारी कामाचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते. सोनियाचे इन्स्टाग्राम सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 17.9 हजार पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. IAS सोनिया मीना (IAS Sonia Meena) सध्या भोपाळ मंत्रालयात कार्यरत आहेत.

या जिल्ह्यांमध्ये दिली आहे सेवा (IAS Success Story)
सोनिया मीना यांनी 2013 पासून मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये सेवा बजावली आहे. यामध्ये तिला अनुपपूर जिल्ह्यात एसडीएम, एडीएम, जिल्हा पंचायत सीईओ आणि जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. 2017 मध्ये, छतरपूर जिल्ह्यातील राजनगरमध्ये SDM असताना, खाण माफिया अर्जुन सिंह यांच्यावर कारवाई केल्यामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. सोनिया मीना (IAS Sonia Meena) यांचा दबदबा इतका आहे की तिची नियुक्ती असलेल्या ठिकाणी खाण आणि दारू माफिया फार काळ टिकत नाहीत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com