करिअरनामा ऑनलाईन । आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल (IAS Success Story) सांगणार आहोत ज्याने देशातील सर्वात कठीण परीक्षेत सेल्फ स्टडीच्या जोरावर यश मिळवले आहे. सोहनलाल असे या व्यक्तीचे नाव आहे. राजस्थानचे रहिवासी असलेल्या सोहन लाल यांनी UPSC परीक्षा पास करून IAS पदापर्यंत मजल मारली आहे. आपण जाणून घेणार आहोत त्यांची अभ्यासाच्या रणनितीविषयी…
वडील शेतकरी तर आई करते मजुरी
सोहन लाल हा जोधपूर, राजस्थानचा रहिवासी आहे. त्यांनी सीकर येथील शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर ते आयआयटी दिल्लीत दाखल झाले. येथून त्यांनी (IAS Success Story) इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर पदवी घेतली. सोहनलालचे वडील गोरधन राम शेती करतात, तर आई मनरेगामध्ये मजुरी करून घराला हातभार लावते.
…यासाठी कॅम्पस प्लेसमेंट नाकारली (IAS Success Story)
सोहन लालने आयआयटी दिल्लीतून बीटेक केल्यानंतरच ठरवले होते की, नोकरी करायची नाही. कारण सोहनलाल यांना आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे होते. याच कारणामुळे IITने आयोजित केलेल्या कॉलेज कॅम्पस प्लेसमेंटमध्ये ते सहभागी झाले नाहीत. त्यांनी वेळ न घालवता यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी सुरू केली.
कोचिंग क्लास न लावता Youtube वरून केली तयारी
यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेच्या तयारीसाठी सोहनलाल (IAS Success Story) यांनी कोणत्याही महागड्या कोचिंग क्लासचा आधार घेतला नाही. इंटरनेटच्या मदतीने यूट्यूबवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओच्या वाचनासह नोट्स काढण्यावर जास्त भर दिला.
तीन वेळा आलं अपयश
UPSC ची परीक्षा देताना सोहन लाल एक-दोनदा नव्हे तर सलग तीनवेळा नापास झाले होते, तरीही त्यांनी हार मानली नाही. ते कायम प्रयत्न करत राहिले. मागील परिक्षेत केलेल्या (IAS Success Story) चुकांवर ते सतत काम करत राहिले. तीन वेळा आलेल्या अपयशामुळे ते खचले नाहीत. IAS होण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा परीक्षेचा फॉर्म भरला आणि पूर्ण क्षमतेने अभ्यासाची तयारी सुरु केली.
चौथ्या प्रयत्नात IAS पद मिळवलं
परिक्षेत तीन वेळा अपयश आल्यानंतर सोहन लाल यांनी अभ्यासात चांगली पकड मिळवली होती. यावेळी त्यांची मेहनत रंगली. त्यांनी UPSC च्या तीनही टप्प्यांत उत्तम कामगिरी (IAS Success Story) केली. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीत चांगली कामगिरी करून त्यांनी संपूर्ण भारतातून 681 वा क्रमांक मिळविला. ही रँक मिळवून ते IASअधिकारी झाले; आणि पाहिलेले स्वप्न पूर्ण केले.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com