करिअरनामा ऑनलाईन । आजच्या कथेतील श्वेता अग्रवाल हिने (IAS Success Story) तीनदा UPSC परीक्षा दिली आहे. या परीक्षा ती तीन वेळा उत्तीर्ण झाली आणि तिची निवड देखील झाली. पण तिला तिच्या आवडीचे IAS पद मिळेपर्यंत तिने हार मानली नाही आणि आपले प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर 2016 मध्ये तिला IAS पद मिळाले.
श्वेता अग्रवाल यांचं बालपण
श्वेताचा जन्म पश्चिम बंगालमधील हुगळी येथे झाला. जुन्या विचारांच्या कुटुंबात जन्म झाल्यामुळे घरातील वातावरण आनंदी नव्हते. 28 लोकांच्या या (IAS Success Story) मारवाडी कुटुंबात सुरुवातीपासूनच मुलींचा जन्म झाल्यानंतर आनंद साजरा होत नव्हता. कारण या लोकांची समजूत अशी होती की घरात फक्त मुलीच जन्माला आल्या तर वंश वृध्दी कशी होणार?
पण याउलट श्वेताच्या पालकांची विचारसरणी वेगळी होती. त्यांनी श्वेताचा जन्म केवळ देवाची कृपा मानला नाही तर त्या दोघांनी मिळून ठरवले की ते कुटुंबातील परंपरांच्या विरुद्ध जावून आपल्या मुलीला उच्च शिक्षण देतील. घरातील या वातावरणामुळे श्वेताला प्रत्येक पाऊलावर भविष्यात खूप संघर्ष करावा लागला आहे.
वयाच्या 7 व्या वर्षी पैसा आणि अभ्यास दोन्हीची किंमत कळली
श्वेता अग्रवालच्या आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती बिकट होती. पण तरीही श्वेताने चांगल्या इंग्रजी शाळेत शिकावे अशी त्यांची इच्छा होती. या विचाराने त्यांनी श्वेताला खासगी शाळेत प्रवेश मिळवून दिला. एके दिवशी श्वेताच्या शाळेत एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमासाठी श्वेताने तिच्या पालकांकडे पैसे मागितले. यावर तिच्या आईने श्वेताला घरची परिस्थिती सांगितली आणि (IAS Success Story) सांगितले की कसे तरी ते तिच्या शाळेच्या फीची व्यवस्था करू शकतील, अशा प्रकारे ते इतका अतिरिक्त खर्च उचलू शकत नाहीत. या घटनेतून श्वेताला वयाच्या सातव्या वर्षी पैसा आणि अभ्यास या दोन्हीची किंमत कळली होती. त्यादिवशीच्या घटनेनंतर श्वेताने आई वडिलांचा आर्थिक भार कमी व्हावा यास्तही नातेवाईकांनी दिलेले पैसे आईला देण्यास सुरवात केली.
पदवीसाठी करावा लागला संघर्ष
श्वेता लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती आणि तिने 12 वी च्या परिक्षेत शाळेत टॉप केले. बारावीनंतर श्वेताने ग्रॅज्युएशन करण्याबद्दल तिच्या कुटुंबात चर्चा केली, तेव्हा तिच्या घरच्यांनी श्वेताच्या अभ्यासात अजिबात रस दाखवला नव्हता. कारण श्वेताच्या (IAS Success Story) कुटुंबात वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत मुलींची लग्ने लावून दिली जात होती. शिक्षणासाठी घरातून विरोध होत होता; पण या विरोधाला न जुमानता श्वेता आपल्या निर्णयावर ठाम राहिली.
तिने सेंट झेवियर्स कॉलेजमधून इकॉनॉमिक्समध्ये ग्रॅज्युएशन केले आणि कॉलेजमध्ये टॉपर बनली. यानंतर श्वेताला एमबीए उत्तीर्ण झाल्यानंतर MNCमध्ये चांगली नोकरी मिळाली. अशा प्रकारे श्वेता तिच्या कुटुंबातील 15 मुलांपैकी पहिली पदवीधर मुलगी ठरली.
खाकी वर्दीने झाली प्रभावीत
श्वेताने एका मुलाखतीत सांगितले की, तिच्या घराजवळ एक पोलिस स्टेशन आहे, लहानपणी जेव्हा ती पोलिस स्टेशनमध्ये अधिकाऱ्यांना पाहायची तेव्हा (IAS Success Story) त्यांनी घातलेला खाकी गणवेश पाहून ती खूप प्रभावित झाली. तिला लहानपणापासूनच खाकीची खूप आवड होती आणि तिला नेहमी वाटायचे की एक दिवस तीही असा गणवेश घालेल.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी करत असताना तिचे मन नोकरीत रमले नाही. लहानपणी अधिकारी होण्याचे स्वप्न पहिल्याने श्वेताने खूप विचार करून UPSCची तयारी करण्याचा निर्णय घेतला. श्वेतासाठी हा खूप मोठा निर्णय होता कारण ती मोठ्या पगरच्या पॅकेजसह खूप (IAS Success Story) मोठ्या पदावर काम करत होती. अखेर श्वेताने UPSC ची तयारी करण्याचा निर्णय घेऊन नोकरी सोडली आणि परीक्षेच्या तयारीस सुरवात केली.
लग्नासाठी कुटुंबातून दबाव
नोकरी सोडून घरी येण्याचा श्वेताचा अचानक घेतलेला निर्णय कोणालाच समजू शकला नाही. पण श्वेता सर्व काही विसरून UPSC ची तयारी करू लागली, पण हे करत असताना एक वेळ अशी आली जेव्हा श्वेता मानसिकदृष्ट्या अस्थिर झाली आणि तिला अजिबात अभ्यास (IAS Success Story) करता आला नाही. अशा परिस्थितीत तिच्यावर कुटुंबाकडून लग्नासाठी दबाव आणला जात होता कारण ती तिच्या कुटुंबातील एकमेव मोठी मुलगी होती जी अविवाहित होती. याबाबत श्वेताच्या पालकांनी तिच्याशी बोलले असता तिने थोडा वेळ मागितला आणि सांगितले की मला माहित आहे की ही परीक्षा अवघड आहे पण मी माझे IAS होण्याचे स्वप्न नक्कीच पूर्ण करेन.
अभ्यासासाठी घरापासून लांब राहिली
UPSCच्या तयारीसाठी तिने घरापासून दोन तासांच्या अंतरावर एक खोली भाड्याने घेतली आणि ती तिथे राहू लागली. या दरम्यान ती सर्व कामे करायची (IAS Success Story) आणि अभ्यासही करायची. अभ्यास करताना श्वेताने दोन महिने कोचिंग घेतले, पण तिथूनही असमाधानी राहिल्याने शेवटी स्वयं अध्ययन करण्याचे ठरवले आणि रात्रंदिवस अभ्यास सुरू ठेवला.
तीन वेळा झाली निवड
श्वेताने एका मुलाखतीत सांगितले की, UPSC ही अशी परीक्षा आहे की त्यात विद्यार्थी पास झाला तरी पुढच्या प्रयत्नात त्याची पुन्हा निवड होईल की नाही याची शाश्वती नसते. या परीक्षेसाठी प्रत्येक वेळी शून्यापासून सुरुवात करावी लागते. हा धोका श्वेतसोबतही (IAS Success Story) झाला असता पण तिने फक्त मनाचे ऐकले आणि निरुपयोगी गोष्टींकडे लक्ष न देता पुन्हा परीक्षा दिली. श्वेता अग्रवाल हिला पहिल्याच प्रयत्नात 497 वी रँक मिळाली होती.
पुढच्या वर्षी 2015 मध्ये, श्वेता पुन्हा UPSC मध्ये निवडली गेली आणि यावेळी तिला 141 वा क्रमांक मिळाला आणि यावेळी देखील ती दहाव्या क्रमांकाने IAS पद मिळविण्यापासून वंचित राहिली. यावेळी तिला IPS पद मिळाले पण तरीही तीच्या मनात IAS होण्याही इच्छा घर करुन होती. एकीकडे इतर विद्यार्थी UPSC परिक्षेत एकदाच निवड होणं हे आपलं नशीब मानत असताना दुसरीकडे आयएएस पदासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करण्याची जोखीम पत्करून श्वेता धाडस करत होती.
पश्चिम बंगालची पहिली टॉपर (IAS Success Story)
श्वेताने 4 ते 5 वर्षे IAS होण्यासाठी दिवसातून 9 तास अभ्यास केला आणि शेवटी नशिब ही श्वेतासमोर नतमस्तक झाले आणि 2016 मध्ये तिने ऑल इंडिया (IAS Success Story) रँक 19 मिळवून ही परीक्षा उत्तीर्ण केली. यासह श्वेता अग्रवाल ही जवळपास दशकभरानंतर पश्चिम बंगालची पहिली टॉपर ठरली, जिने टॉप 20 मध्ये स्थान मिळवले.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com