करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकऱ्या मिळविण्यासाठी लाखो उमेदवार (IAS Success Story) स्पर्धा परीक्षा देतात. सरकारी नोकऱ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. IAS कुणाल यादवने UPSC परीक्षेची तयारी करून आणि त्यात यश मिळवले आहे. त्याची कहाणी काही औरच आहे. कुणालला सलग 8 सरकारी नोकऱ्यांची ऑफर मिळाली होती. पण त्याने आपली IAS होण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी या 8 नोकऱ्यांवर पाणी सोडलं आहे.
लहानपणापासूनच अभ्यासात हुशार (IAS Success Story)
पूर्णवेळ नोकरीसोबतच यूपीएससी परीक्षेची तयारी करू इच्छिणाऱ्या सर्व इच्छुकांसाठी कुणालची कहाणी प्रेरणादायी ठरणार आहे. कुणाल सुरुवातीपासूनच अभ्यासात खूप हुशार होता. तो जैन पब्लिक स्कूलमधून बारावीच्या बोर्ड परीक्षेत नॉन मेडिकल प्रकारात जिल्ह्यामध्ये अव्वल ठरला. यानंतर कुणालने दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून B. Sc पूर्ण केले. त्याने नॉन-मेडिकल स्ट्रीममध्ये रसायनशास्त्राचे शिक्षण घेतले आहे.
2015 पासून तयारी सुरु
IAS कुणाल यादवने 2015 मध्ये पदवीनंतर प्रशासकीय सेवेसाठी तयारी सुरू केली. 2015 मध्ये त्याने पहिल्यांदा SSC CGL परीक्षा उत्तीर्ण केली. पण त्याला ही नोकरी आवडली (IAS Success Story) नाही म्हणून त्याला त्यात जॉईन व्हायचे नव्हते. नंतर त्याने स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पीओ पदासाठी अर्ज केला आणि त्यातही त्याची निवड झाली.
रोजचा 10 ते 12 तासाचा अभ्यास
दररोज 10 ते 12 तास अभ्यास करणार्या आयएएस कुणाल यादवने यूपीएससी परीक्षा 2020 च्या दुसऱ्या प्रयत्नात संपूर्ण भारतात 185 वा क्रमांक मिळविला. IAS प्रशिक्षणानंतर, 2021 मध्ये (IAS Success Story) त्याची दिल्लीच्या आयकर विभागात निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. UPSC परीक्षेची तयारी नोकरीसोबतच करता येते याचे तो मुर्तिमंत उदाहरण आहे.
स्वप्नांच्या आड अडथळे येऊ शकत नाहीत
रेवाडी शहरातील शक्तीनगर येथील रहिवासी असलेल्या कुणाल यादवने आपल्या यशाने हे सिद्ध केले आहे की तुमच्या स्वप्नांसमोर अडथळे येऊ शकत नाहीत. नोकरीसोबतच त्यांनी UPSC परीक्षेची तयारी केली आणि त्यातही ते यशस्वी झाले. याआधी त्याने बँकेची परीक्षाही पास केली होती.
अनेक सरकारी परीक्षा पास केल्या
कुणाल यादवने UPSC परीक्षेपूर्वी इतर अनेक सरकारी परीक्षा दिल्या होत्या. स्टेट बँकेनंतर त्याची आर्मीमध्ये स्टेशन मास्टर तसेच असिस्टंट कमांडंट या पदासाठीही निवड (IAS Success Story) झाली, पण त्यांनी दोन्ही नोकऱ्या न जुमानता यूUPSC परीक्षेची तयारी सुरू केली. नोकरीसोबतच त्यांनी IAS होण्याची तयारीही सुरू ठेवली. 2018 मध्ये तो पहिल्याच प्रयत्नात पूर्व परीक्षा पासही झाला. IAS कुणाल यादवने 2020 मध्ये UPSC परीक्षेच्या दुसऱ्या प्रयत्नात 185 वा क्रमांक मिळविला. IAS प्रशिक्षणानंतर, 2021 मध्ये, त्यांची दिल्ली येथे आयकर विभागात निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com