IAS Success Story : UPSC क्रॅक करुन मनोजनं ठोकला षटकार; उत्कृष्ठ रणजी क्रिकेटपटू असा बनला IAS

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । मनोज महारिया हा राजस्थानमधील कुदान (IAS Success Story) गावचा रहिवासी आहे. त्याने संघ लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत संपूर्ण भारतातून 628 वा क्रमांक मिळवून IAS पद मिळवलं आणि संपूर्ण गावाचं नाव उंचावलं आहे. विशेष म्हणजे वडिलांच्या पश्चात कुटुंबाची काळजी घेत मनोजने हे यश मिळवले आहे. मनोज हा उत्कृष्ठ रणजी क्रिकेटपटू राहिला आहे. मनोजने आपल्या यशाचा प्रवास कसा केला आणि आपले मिशन कसे पूर्ण केले ते जाणून घेऊया…

वडिलांच्या पश्चात कुटुंबाची जबाबदारी पेलली
मनोजचे वडील राजेंद्र महरिया यांचे अचानक निधन झाले. 3 भावंडांमध्ये सर्वात मोठा असल्याने मनोजने वडिलांच्या पश्चात कुटुंबाची अगदी जबाबदरीने काळजी घेतली. UPSC चा निकाल आल्यावर (IAS Success Story) त्याची आई तारादेवी भावूक झाल्या. आपल्या दिवंगत पतीचे स्वप्न मुलाने पूर्ण केल्याने त्यांना कृतार्थ वाटले. या आनंदी बातमीमुळे घरातही जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. ही आनंदाची बातमी गावात पसरताच गावकऱ्यांनी मनोज आणि त्याच्या कुटुंबीयांचे जोरदार स्वागत केले.

….यामुळे क्रिकेट खेळणे सोडले (IAS Success Story)
मनोजने (IAS Manoj Maharia) 10 वीपर्यंतचे शिक्षण गावातील शाळेतूनच घेतले. यानंतर त्याने सीकरमधून बारावी पूर्ण केली. यानंतर त्याचा क्रिकेटकडे ओढा वाढला आणि त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार, मनोज हा उत्कृष्ठ रणजी क्रिकेटपटू राहिला आहे. मनोजने क्रिकेट सोडण्यामागचे कारण म्हणजे 2018 मध्ये त्याला दुखापत झाली होती त्यामुळे तो पुढे खेळू शकत नव्हता. यानंतर तो पुन्हा अभ्यासाकडे वळला आणि अनेक सरकारी नोकरीच्या परीक्षा पास झाला. पण त्याला यामधून समाधान मिळाले नाही; म्हणून त्याने अधिक चांगले करण्याचा प्रयत्न सुरु ठेवला.

लॉकडाऊन काळात सुरु केली UPSC ची तयारी
IAS अधिकारी होणं हे ध्येय मनोजला साध्य करायचं होतं. यासाठी कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये त्याने संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेची तयारी सुरू केली. मनोजच्या म्हणण्यानुसार, त्याला कोचिंग क्लासमध्ये शिकणे सोयीचे नव्हते, म्हणून त्याने स्वतः अभ्यास केला आणि परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नात यूपीएससी (UPSC) मध्ये चांगली रँक मिळवली.

अभ्यास करताना ही काळजी घ्या…
मनोज सांगतो की, त्याला कोचिंगमध्ये अभ्यास करताना आराम मिळत नव्हता, म्हणून त्याने घरीच स्वतः अभ्यास केला. त्याने चांगली रँक घेऊन UPSC पास केली आणि त्याचे IAS (IAS) होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. UPSC च्या तयारीत गुंतलेल्या विद्यार्थ्यांना सल्ला देताना तो सांगतो; अभ्यास करत असताना तुम्हाला कुठूनही मिळत असलेल्या माहितीचा वापर करू नका. तुमचे स्त्रोत मर्यादित ठेवा जेणेकरून कोणताही गोंधळ होणार नाही. तयारी दरम्यान, नातेवाईक आणि विविध सोहळ्यांना हजर राहणं सोडावं लागतं. असं केल्याशिवाय तुम्हाला परिक्षेत अपेक्षित निकाल मिळवता येत नाही.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com