IAS Success Story : शाळेत असतानाच IAS व्हायचं ठरवलं; उत्तराखंडच्या अर्पितने 20वी रँक मिळवून जिद्द पूर्ण केलीच

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । UPSCची परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या प्रत्येक (IAS Success Story) उमेदवाराचा प्रवास हा खास असतो. आज आम्ही तुम्हाला उत्तराखंडच्या अर्पित चौहानची गोष्ट सांगणार आहोत, ज्याने या परीक्षेत चांगली रँक मिळवली आणि अवघ्या तिसऱ्या प्रयत्नात तो पास झाला. चला तर मग त्याच्या प्रवासावर एक नजर टाकूया.
शाळेत असतानाच IAS होण्याचं ठरवलं (IAS Success Story)
अर्पित चौहान हा उत्तराखंडमधील उधम सिंग जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो काशीपूरच्या एका खासगी शाळेत शिकत असताना त्याला UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची माहिती मिळाली. यादरम्यान त्याने आपण भविष्यात IAS व्हायचं असं ठरवलं होतं.

IAS Success Story Arpit Chauhan

घरात अभ्यासाचं वातावरण होतं
अर्पितचे आई-वडील दोघेही शिक्षक आहेत. त्याचे वडील (IAS Success Story) प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक तर आई प्राथमिक शाळेत आई शाळेत इंग्रजी शिक्षिका आहे. आई- वडील दोघे शिक्षक असल्यामुळे त्यांच्या घरात सुरुवातीपासूनच शिक्षणाचे वातावरण होते.

इंजिनीअरिंगनंतर UPSC ची तयारी सुरु झाली
काशीपूर येथून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अर्पितने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. अभियांत्रिकीनंतरच त्याने शालेय जीवनातच आपले स्वप्न साकार करण्याचा निर्णय (IAS Success Story) घेतला आणि UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली.

IAS Success Story Arpit Chauhan

अवघ्या तिसऱ्या प्रयत्नात मिळाली 20 वी रॅंक
अर्पितला UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नाही. पहिल्याच प्रयत्नात तो अपयशी ठरला होता. यानंतर न खचता प्रयत्न सुरु ठेवून तो पुन्हा मैदानात उतरला. यावेळी (IAS Success Story) अर्पितने पूर्व, मुख्य आणि मुलाखत असे परीक्षेचे  तिन्ही टप्पे यशस्वीपणे पूर्ण केले. तो यापूर्वी देशाच्या संरक्षण सेवेत रुजू झाला होता. या कामगिरीवर तो आनंदी नव्हता. त्यामुळे त्याने पुन्हा प्रयत्न केले आणि UPSC परीक्षेच्या तिसऱ्या प्रयत्नात तो यशस्वी झाला. या परीक्षेत त्याने संपूर्ण भारतातून 20 वा क्रमांक मिळवला आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com