करिअरनामा ऑनलाईन । गुगलमध्ये नोकरी मिळणे हे तरुणांसाठी (IAS Success Story) एखाद्या स्वप्नातील नोकरीपेक्षा कमी नाही. पण असेही काही जिद्दी तरुण आहेत जे UPSC परीक्षेच्या तयारीसाठी बड्या पगराच्या नोकरीवर पाणी सोडताना दिसतात. अनेकदा असं दिसतं, की एवढी मोठी रिस्क घेवून त्यांना अपयशाचा सामना करावा लागतो; पण त्यांच्या हेतुत मात्र बदल होत नाही. आज आम्ही अशाच एका व्यक्तीची गोष्ट सांगणार आहोत, ज्याने UPSC परीक्षेसाठी गुगलची नोकरी सोडली आणि अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतर यश मिळवले. हे यश किरकोळ नसून त्यांनी या परिक्षेत संपूर्ण भारतातून पहिला क्रमांक पटकावला आहे. 2017 मध्ये घेण्यात आलेल्या UPSC नागरी सेवा परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या अनुदीप दुरीशेट्टीविषयी आपण जाणून घेणार आहोत. त्यांचा UPSC चा प्रवास कसा होता ते पाहूया…
तेलंगणाचे आहेत अनुदीप दुरिशेट्टी
अनुदीप दुरिशेट्टी हे तेलंगणाचे आहेत. येथून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी BITS पिलानी येथून अभियांत्रिकीमध्ये बॅचलर पदवी घेतली आहे. ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर त्यांना गुगल कंपनीत नोकरी मिळाली.
Google मध्ये नोकरीसह UPSC चा अभ्यास
अनुदीप गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करत होते. पण त्यांचे या नोकरीत फारसे मन रमले नाही, कारण त्यांचे स्वप्न काही वेगळेच होते. खरे तर त्यांना नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन IAS व्हायचं होतं. त्यामुळे त्यांनी नोकरी करतच UPSC चा अभ्यास सुरु ठेवला. तसेच अनुदीप यांनी पदवीचे शिक्षण घेत असतानाच UPSC परीक्षेची तयारी सुरू केली होती. यादरम्यान त्यांनी पूर्व आणि मुख्य परीक्षा पास केली होती मात्र ते मुलाखतीत तो नापास झाले. त्यामुळे नोकरीच्या काळातही त्यांनी अभ्यास सुरूच ठेवला.
अनेक प्रयत्नांमध्ये अपयश
2013 मध्ये अनुदीप पुन्हा एकदा UPSC परीक्षेस बसले. या परीक्षेत त्यांना 790 वी रँक मिळाली. या रॅंकमुळे त्यांना भारतीय महसूल सेवा मिळाली. मात्र त्यांना IAS व्हायचे असल्यामुळे त्यांना मिळालेल्या IRS पदावर ते समाधानी नव्हते. तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही. ते पुन्हा पुन्हा परीक्षा देत राहिले. अनेकवेळा अपयश येवूनही ते थांबले नाहीत. ‘तुमच्या उणिवा ओळखा आणि काम करत राहा’; असा सल्ला तरुणांना ते नेहमी देतात.
अखेर प्रथम क्रमांक मिळवलाच
अनुदीप यांनी शेवटच्या प्रयत्नात यश मिळवले. हे यश किरकोळ नव्हते. तर, 2017 मध्ये UPSC परीक्षेत त्यांनी संपूर्ण भारतातून पहिला क्रमांक पटकावला होता. अशा प्रकारे त्यांचे IAS अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com