करिअरनामा ऑनलाईन । IAS अधिकरी अनुराग यांचं असं म्हणणं (IAS Success Story) आहे की UPSC किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवाराने परीक्षेच्या तयारीसाठी नव्याने सुरुवात करावी. प्रत्येकाने त्यांच्या पूर्वीच्या शैक्षणिक पार्श्वभूमीकडे दुर्लक्ष करावे. जरी तुम्हाला या परीक्षेशी संबंधित कोणत्याही विषयाचे पूर्व ज्ञान नसले तरीही तुम्ही ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकता; फक्त तुम्ही तुमच्या ध्येयापासून लांब गेले नाही पाहिजे.
UPSC नागरी सेवा परीक्षा पास करण्यासाठी कोणताही मंत्र नाही तर ही परीक्षा पास होण्यासाठी चिकाटी आणि एकाग्रता आवश्यक आहे. देशभरातून दरवर्षी अनेक उमेदवार या परीक्षेची तयारी करत असतात. खडतर अशा UPSC परीक्षेत यश मिळविण्यासाठी IAS अनुराग कुमार (IAS Anurag Kumar) यांची प्रेरणादायी कथा वाचून तुम्ही नक्कीच प्रेरीत व्हाल. अनुराग यांनी 2018 मध्ये UPSC (UPSC) नागरी सेवा परीक्षा पास केली केली आणि संपूर्ण देशात 48 वा क्रमांक मिळवला. सध्या ते बिहारमधील भागलपूर येथे डीडीसी म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.
अपयश आले पण स्वप्नांचा पाठलाग सोडला नाही (IAS Success Story)
अनुराग यांची आयएएस (IAS) अधिकारी बनण्याची कहाणी खूपच विलक्षण आहे. त्यांना या प्रवासात अनेकवेळा अपयश आले पण त्यांना आयएएस अधिकारी बनण्याचे ध्येय गाठण्यापासून कोणी रोखू शकले नाही. कॉलेज करत असताना ते वार्षिक परिक्षेत नापास झाले; पण ते खचले नाहीत. जिद्दीने कॉलेज पूर्ण करुन त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु करण्याचे ठरवले.
शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाची केली निवड
अनुराग हे मूळचे बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी आठवीपर्यंतचे शिक्षण हिंदी माध्यमातून पूर्ण केले होते. यानंतर त्यांनी उच्च शिक्षणाचे माध्यम बदलले. हिंदी माध्यमातून शिक्षण घेण्याऐवजी त्यांनी इंग्रजीतून शिकायला सुरवात केली. भाषेचे माध्यम बदलल्याने त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. पण त्यांनी कठोर परिश्रम घेतले आणि इयत्ता 10 वी आणि 12 वी मध्ये चांगली कामगिरी केली.
12 वी नंतर पदवीच्या शिक्षणासाठी ते दिल्लीला आले. येथे त्यांनी श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये प्रवेश घेतला आणि अर्थशास्त्राचा अभ्यास केला. यानंतर, 2016 मध्ये, त्यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.
ग्रॅज्युएशन करतानाच सुरु केली UPSC ची तयारी
पोस्ट ग्रॅज्युएशनला प्रवेश घेतल्यानंतरच अनुराग यांनी यूपीएससी (UPSC) सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी सुरू केली. सिव्हिल सर्व्हिसेस टेस्टमध्ये मिळालेलं यश हे त्याच्या कठोर मेहनतीचं फळ असल्याचं अनुराग सांगतात.
नवीन उमेदवारांना सल्ला देताना ते म्हणतात; “उमेदवारांनी या परीक्षेला नव्याने सुरुवात करावी आणि त्यांच्या पूर्वीच्या शैक्षणिक पार्श्वभूमीकडे दुर्लक्ष करावे. तुम्हाला या परीक्षेशी संबंधित (IAS Success Story) कोणत्याही विषयाचे पूर्व ज्ञान नसले तरीही तुम्ही या परीक्षेचा प्रयत्न करू शकता आणि यामध्ये उत्तीर्ण होऊ शकता. कोणीही या परीक्षेत घाई करण्यापेक्षा प्रत्येक विषयावर सखोल संशोधन करण्याची गरज आहे. ही पद्धतच तुम्हाला यश मिळवून देवू शकते.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com