करिअरनामा ऑनलाईन। अंशूने सांगितले की, तिच्या बरोबरची प्रत्येक (IAS Success Story) मुलगी विवाहित आहे, परंतु घरच्यांनी तिच्यावर कधीही लग्नासाठी दबाव टाकला नाही. कुटुंबीयांनी तिला जीवनात पुढे जाण्यासाठी मार्ग मोकळे केले आणि तिला भक्कम पाठिंबा दिला. याचा परिणाम असा झाला की तिला आयुष्यात हवे ते मिळवता आले. ही कहाणी आहे बिहारच्या अंशू प्रिया या तरुणीची.
तुमच्यामध्ये प्रबळ इच्छाशक्ती असेल, तर तुमच्यासाठी यशाचा मार्ग खुला होतो हे खरं आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट, जमालपूर येथील अंशु प्रियाने संपूर्ण भारतातून 16 वा क्रमांक मिळवत IAS पदापर्यंत मजल मारली आहे. विशेष म्हणजे ती पेशाने डॉक्टर आहे.
तिसऱ्या प्रयत्नात मारली बाजी (IAS Success Story)
अंशु प्रिया 2019 मध्ये पहिल्यांदा परीक्षेला बसली होती. परंतु ती पूर्व परीक्षा देखील उत्तीर्ण होवू शकली नाही. दुसऱ्या प्रयत्नातही त्याला अपयश आलं. अखेर 2021 मध्ये तीने मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली आणि AIR 16 मिळवली.
कोण आहे IAS अंशू प्रिया?
अंशू MBBS पदवीधर असून बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिचे वडील शिक्षक आहेत. ती शिक्षकांच्या कुटुंबातील आहे आणि तिचे दोन्ही आजी आजोबाही शिक्षण (IAS Success Story) देण्याचे काम करत होते. अंशू प्रियाने तिचे शालेय शिक्षण नोट्रे डेम अकादमी मुंगेर येथे पूर्ण केले आणि नंतर MBBS करण्यासाठी ती एम्स पटना येथे गेली. त्यानंतर पटना एम्समध्ये तीने निवासी डॉक्टर म्हणून काम केले. UPSC ची परीक्षा देताना तीने कठोर परिश्रम घेतले. वैद्यकीय विज्ञान हा तिचा ऐच्छिक विषय होता.
डॉक्टर झाल्यानंतर घेतला UPSC चा निर्णय (IAS Success Story)
MBBS पदवी मिळाल्यानंतर अंशुने काही रुग्णालये आणि आरोग्य सेवा केंद्रांमध्ये प्रॅक्टिसही केली. डॉक्टर होवूनही अंशू समाधानी नव्हती. कारण तीने IAS होण्याचं ध्येय उराशी (IAS Success Story) बाळगलं होतं. निवासी डॉक्टर म्हणून नोकरी करत असताना तीने UPSC परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला आणि तिसर्याच प्रयत्नात ती या परिक्षेत उत्तीर्ण झाली.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com