HSC RESULT 2022 : बोर्डाच्या परीक्षेत मनासारखे मार्क्स मिळाले नाहीत? चिंता नको… Rechecking साठी असा करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेला 12 वी चा निकाल अखेर (HSC RESULT 2022) आज जाहिर झाला. यंदा तब्बल दोन वर्षांनी ऑफलाईन परीक्षा झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड परीक्षेविषयी भिती निर्माण झाली होती. तसंच पालकंही चिंतेत असल्याचं पहायला मिळालं. पण या निकालात तुम्हाला काहीही त्रुटी आढळल्या किंवा मनासारखे मार्क्स मिळाले नाहीत तर चिंता करू नका. तुम्ही तुमचे पेपर्स रिचेकिंगला देऊ शकता. याची संपूर्ण प्रक्रिया आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 18 फेब्रुवारी ते 20 मार्च दरम्यान इयत्ता 12वी ची परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर झाला आहे.

बऱ्याचवेळा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना अपेक्षेप्रमाणे मार्क मिळाले नसल्याचे लक्षात येते. पेपर चांगले सोडवल्यानंतरही (HSC RESULT 2022) चांगले मार्क्स मिळू शकत नाहीत. यामुळे गुणांमध्येहे फरक पडतो. यामुळे विद्यार्थ्यांची निराशा होते. म्हणूनच बोर्डाने निकालानंतर Recheckingची व्यव्यस्था केली आहे. ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल Recheckingसाठी द्यायचा आहे त्यांच्यासाठी यंदा ही विशेष सोय करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनासाठी बोर्डाकडून देण्यात आलेल्या वेबसाईटवर येत्या 10 जूनपासून अर्ज करता येणार आहे. पेपर Rechecking ला देण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन फी भरावी लागणार आहे.

जाणून घ्या Rechecking Process – (HSC RESULT 2022)

  1. पेपर रिचेकिंगला देण्यासाठी आधी विद्यार्थ्यांना verification.mh-hsc.ac.in या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करायची आहे.
  2. यानंतर विद्यार्थ्यांना रिचेकिंगसाठी त्यांचे अर्ज करायचे आहेत.
  3. यानंतर विवद्यार्थ्यांचे पेपर्स गुण मूल्यांकनाला mark evaluation जाणार आहेत.
  4. यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या पेपर्सच्या छाया प्रत मिळणार आहेत.
  5. यानंतरही पेपरमध्ये काही शंका असल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या पेपर्सना रिचेकिंग ला देता येणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी काही महत्वाच्या तारखा –

  1. 10 जून ते 20 जून – पेपर्स रिचेकिंगला देण्यासाठी अर्ज करण्याचा कालावधी
  2. 10 जून ते 29 जून – तुमच्या उत्तपत्रिकेच्या प्रिंटसाठी अर्ज करण्याचा कालावधी.
  3. 10 जून – पुरवणी परीक्षेसाठी अर्ज सुरु होण्याची तारीख.
  4. 17 जून – विद्यार्थ्यांना दुपारी 3 वाजल्यापासून मार्कशीट मिळणार.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com