करिअरनामा ऑनलाईन । यंदा तब्बल दोन वर्षांनी ऑफलाईन परीक्षा झाल्यामुळे (HSC Result 2022) विद्यार्थ्यांच्या मनात १२ वी बोर्डाच्या परीक्षेविषयी प्रचंड भीती निर्माण झाली होती. तसंच विद्यार्थ्यांच्या पालकांमध्येही चिंतेचं वातावरण होतं. मात्र आता निकाल अखेर जाहीर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १२ वी च्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे. यासोबत त्यांनी विद्यार्थ्यांना एक महत्वाचा आणि मोलाचा संदेश दिला आहे. त
काय म्हणाले मुख्यमंत्री..
“आयुष्यात परीक्षेतील यशाला महत्व असतेच. परीक्षा भविष्यात येणाऱ्या आव्हानांची तयारी करून घेते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. यानंतर सुरु होणाऱ्या शैक्षणिक वाटचालीसाठी आणि आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये भविष्य घडवण्यासाठी हार्दिक शुभेच्छा. (HSC Result 2022) या वाटचालीतून तुम्हाला आपल्या कुटुंबियांसह, समाज आणि देशाचे भविष्य उज्वल करण्याची संधी मिळणार आहे, या संधीचे आपण सोने कराल, हा विश्वास आहे. काहींना या टप्प्यावर यशाने थोडक्यात हुलकावणी दिली असेल, अशांनीही खचून न जाता पुन्हा एक संधी म्हणून नव्या जोमाने तयारी केल्यास, यश तुमचेच असेल; “असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हटलं आहे.
काय म्हणाले उप मुख्यमंत्री…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही बारावी परीक्षेत चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले किंवा जे पास होऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना संदेश देत मोलाचा सल्ला दिला आहे. “बारावीचा निकाल म्हणजे हा अंतिम टप्पा नाही. यापुढेही (HSC Result 2022) असे अनेक टप्पे तुम्हाला गाठायचे आहेत. त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थी व पालकांनी निराश न होता, खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत. शिक्षणाच्या बरोबरीनं कला, क्रीडा, तांत्रिक कौशल्य विकसित करुन जीवनात यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हंटलं आहे.
कोणत्या विषयाचा किती टक्के निकाल – (HSC Result 2022)
- एकूण 153 विषयांपैकी 24 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
- विज्ञान शाखेचा राज्याचा 98.30 टक्के इतका बंपर निकाल लागला आहे.
- कला शाखेचा राज्याचा निकाल 90.51 टक्के इतका निकाल लागला आहे.
- वाणिज्य विभागाचा निकाल 91.71 टक्के इतका लागला आहे
विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या तारखा –
- 10 जून ते 20 जून – पेपर्स रिचेकिंगला देण्यासाठी अर्ज करण्याचा कालावधी
- 10 जून ते 29 जून – तुमच्या (HSC Result 2022) उत्तपत्रिकेच्या प्रिंटसाठी अर्ज करण्यासाठीचा कालावधी.
- 10 जून – पुरवणी परीक्षेसाठी अर्ज सुरु होण्याची तारीख.
- 17 जून – विद्यार्थ्यांना दुपारी 3 वाजल्यापासून मार्कशीट मिळणार. (HSC Result 2022)
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com