HSC Result 2022 : BIG BREAKING!! बारावीचा निकाल लागला!! राज्यातील 94.22% विद्यार्थी पास; यंदाही मुलींची बाजी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (HSC Result 2022) मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होत आहे. दुपारी 1 वाजता सर्व विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. ऑनलाईन निकाल जाहीर होण्यापूर्वी शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याचा एकूण निकाल 94.22 टक्के इतका लागला आहे.

निकाल ऑनलाईन जाहीर होण्यापूर्वी शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. (HSC Result 2022) राज्याचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. (HSC Result 2022) राज्यात कोकण विभाग अव्वल ठरला आहे. कोकण विभागाचा निकाल 97.21% इतका लागला आहे. मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 90.91 टक्के इतका लागला आहे. 14 लाख 39 हजार 731 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी 13,56,604 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

यंदाही मुलींची बाजी (HSC Result 2022)

यंदाच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा एकूण निकाल 95.35 टक्के तर मुलांचा एकूण निकाल 93.29 टक्के इतका लागला आहे. तर 24 विषयांचा निकाल 100 % लागला आहे.

विज्ञान शाखेचा बंपर निकाल- 

विज्ञान शाखेचा राज्याचा 98.30 टक्के इतका (HSC Result 2022) बंपर निकाल लागला आहे. कला शाखेचा राज्याचा निकाल 90.51 टक्के इतका निकाल लागला आहे. तर वाणिज्य विभागाचा निकाल 91.71 टक्के लागला आहे.

पहा राज्याचा विभागवार निकाल – (HSC Result 2022)

  • पुणे: 93.61%
  • नागपुर: 96.52%
  • औरंगाबाद: 94.97%
  • मुंबई: 90.91% (HSC Result 2022)
  • कोल्हापूर: 95.07%
  • अमरावती: 96.34 %
  • नाशिक: 95.03%
  • लातूर: 95.25%
  • कोकण: 97.21%

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. (HSC Result 2022) या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेचा निकाल दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

कुठे पाहता येईल परीक्षेचा निकाल –

http://www.mahresult.nic.in

http://www.hscresult.mkcl.org

https://hsc.mahresults.org.in

यंदाच्या परीक्षेत राज्यभरातून 14,85,191 विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये 8,17,188 इतकी मुले तर 6,68,003 इतक्या मुली आहेत. परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे (HSC Result 2022) विषयनिहाय गुण वरील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील. याची प्रिंट ऑऊट घेता येईल. अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विषयात संपादित केलेल्या गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतरण प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने (http://verification./mh-hsc.ac.in) अर्ज करता येईल.

महत्वाचे : विद्यार्थ्यांना गुणपत्रिका संबंधित उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शुक्रवार दिनांक 17 जून 2022 रोजी दुपारी 3 वाजेपासून वितरित करण्यात येतील.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com