HSC Paper Split Case : 12वीचा पेपर WhatsApp वरुनच झाला लीक; 2 शिक्षकांसह 5 जण अटकेत; पेपर फुटीचे मुंबई कनेक्शन

करिअरनामा ऑनलाईन । बारावी पेपर फुटी प्रकरणात नवनवीन माहिती (HSC Paper Split Case) समोर येत आहे. बुलढाण्यात पेपर फुटीसाठी व्हॉट्स ॲपचा वापर केल्याचं समोर आलं आहे. व्हॉट्सॲप वर ग्रुप बनवून कॉपी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात दोन शिक्षकांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय परीक्षेत पास करून देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 10 ते 12 हजार रुपये घेतले जात असल्याची, माहितीही सूत्रांकडून समोर येत आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप बनवून पेपर लिक

बारावी पेपर फुटी प्रकरणी तपास सुरु असून व्हॉट्स ॲप ग्रुप बनवून कॉपी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 99 जणांचा व्हॉट्सॅप ग्रुप बनवून त्यामध्ये पेपर लीक केल्याचं उघडकीस आलं आहे. या ग्रुपमध्ये शिक्षक, काही विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे पालक व विविध क्षेत्रातील काही व्यक्ती (HSC Paper Split Case) सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पेपर फुटीची घटना समोर आल्यावर हा संबंधित व्हॉट्सॅप ग्रुप डिलीट करण्यात आला. याबाबत पोलिसांच्या सायबर सेलकडून अधिक तपास सुरु आहे. सायबर सेलकडून डिलीट करण्यात आलेल्या डेटा लवकरात लवकर रिकव्हर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

12 वी गणिताच्या पेपरफुटीचे मुंबई कनेक्शन (HSC Paper Split Case)

बारावीच्या गणिताच्या पेपरफुटी प्रकरणाचा संबंध मुंबईतील विद्यार्थ्यांशीही असल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये गणित पेपरचा काही भाग आढळला आहे. डॉ. अँथोनी डिसिल्वा हायस्कूलमधील परीक्षार्थीच्या मोबाईलमध्ये दहा वाजून 17 मिनिटांनी गणिताचा पेपर सापडला. या प्रकरणी तीन विद्यार्थ्यांसह अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्यात आला आहे.

बुलढाण्यात फुटला गणिताचा पेपर

बारावी बोर्डाच्या गणित विषयाच्या प्रश्न पत्रिकेतील दोन पानं सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली होती. याबाबतची बातमी आज सर्व वृत्त वाहिन्यावरून प्रसिध्द झाली. दरम्यान या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून (HSC Paper Split Case) आलेलं नव्हतं. यामुळे इयत्ता 12 वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नसल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र मुंबईतील विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये गणिताच्या पेपरची काही पानं आढळल्याने या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.

शिक्षक, विद्यार्थी, पालकांसह विविध क्षेत्रातील 99 लोक सहभागी

पेपर फुटी प्रकरणाचा तपास सुरु आहे. व्हॉट्सॲप ग्रुप बनवून कॉपी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पेपर कॉपी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या (HSC Paper Split Case) व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये 99 जण असून यामध्ये शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्यासह विविध क्षेत्रातील व्यक्ती सहभागी असल्याचे समोर आले आहे. पेपर फुटीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर हा ग्रुप डिलीट करण्यात आला. यासंदर्भात सायबर पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com