करिअरनामा ऑनलाईन । देशातील प्रत्येक तरुणाला IAS अधिकारी (How to Prepare for UPSC) होण्याची इच्छा असते. पण जे अपार मेहनत, कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द ठेवतात असेच लोक IAS होतात. आपल्या देशात केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC मार्फत IAS होण्यासाठी परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा देण्यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी जीव तोडून मेहनत करतात. खूपच कमी विद्यार्थ्यांना या परीक्षेत यश मिळते. UPSC ही आपल्या देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठित परीक्षा समजली जाते. दरवर्षी लाखो तरुण केवळ काही जागांसाठी या परीक्षेची तयारी करतात.
12 वीत असतानाच घ्या निर्णय (How to Prepare for UPSC)
या परीक्षेत पास होण्याची टक्केवारी खूपच कमी आहे. सिव्हिल सर्व्हिस परीक्षा तुम्हाला द्यायच्या असतील तर तुम्ही त्याचा निर्णय 12वी मध्ये शिकत असतानाच घ्या म्हणजे 12वी नंतर पदवीचे शिक्षण घेताना तीन वर्ष तुम्हाला अभ्यास करण्यासाठी जास्तीचा वेळ मिळेल. NCERTच्या पुस्तकांचा अभ्यास करून या परीक्षेची तयारी सुरू करा. त्याशिवाय सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेसाठी आवश्यक संपूर्ण अभ्यासक्रम आपल्याकडे ठेवा आणि त्यानुसार तयारी करा.
विषयाची निवड महत्वाची
बहुतेक विद्यार्थी त्यांच्या पदवीच्या कोणत्याही एका विषयातून परीक्षेच्या मुख्य टप्प्यासाठी विषय निवडतात. हे आपल्याला सोपे ठरते कारण आपण संपूर्ण तीन वर्ष पदवीसह (How to Prepare for UPSC) या विषयाचा अभ्यास करतो. याशिवाय इतर निवडक विषयांसाठी तुम्ही स्टडी मटेरियल निवडू शकता किंवा तुम्हाला तज्ञांचा सल्ला मिळू शकेल. चालू घडामोडींच्या तयारीसाठी तुम्ही वर्तमानपत्र वाचनासह आणि नियमीतपणे बातम्या बघितल्या पाहिजेत.
NCERT आणि NIOS ची पुस्तके वाचा
तुम्ही NCERT आणि NIOS ची पुस्तके वाचू शकता. ही पुस्तके विनामूल्य उपलब्ध आहेत. सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत या विषयाचा अभ्यास करणे सर्वात महत्त्वाचे आहे, म्हणूनच हा विषय निवडताना तुम्हाला त्या विषयात रस आहे की नाही हे लक्षात ठेवा. जरी कोणत्याही विषयाचा अभ्यास (How to Prepare for UPSC) करणे अशक्य नाही, परंतु तरीही ज्या विषयात आपल्याला रस आहे त्या विषयांची निवड करणे आपल्यासाठी फायदेशीर आहे. UPSC परीक्षेच्या मोठ्या अभ्यासक्रमामुळे वर्षभर अभ्यास करावा लागतो. म्हणून, वेळापत्रक तयार करून वर्षभर अभ्यास करणे आवश्यक आहे.
त्यागाची तयारी ठेवा (How to Prepare for UPSC)
यूपीएससी परीक्षेत यश मिळविण्यासाठी आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे. कारण सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा ही बँकिंग किंवा एसएससी परीक्षा नसते ज्यात यश लगेचच मिळते. तर या परीक्षेच्या तयारीसाठी तुम्हाला त्याग करावा लागेल, त्याशिवाय या परीक्षेत तुम्ही यश मिळू शकत नाहीत. यूपीएससी परीक्षेली तुम्हाला दोन ते तीन वर्षे द्यायची आहेत. या वर्षांमध्ये आपल्याला दररोज नियमित अभ्यास करावा लागतो.
घरी बसूनही करु शकता तयारी
बरेच लोक म्हणतात की, UPSC परीक्षेच्या तयारीसाठी दिल्लीला जाणे आवश्यक आहे; मात्र हे खरंच गरजेचं आहे का हे आपण बघणार आहोत. UPSC परीक्षेची तयारी आपण घरी बसूनही करु शकतो. फक्त आपल्याला जीवनात काही बदल करावे लागतील. अभ्यासाच्या काटेकोर नियोजनासह (How to Prepare for UPSC) आणि योग्य स्टडी मटेरियलसह घरातूनही तुम्ही सिव्हील सर्व्हिसेसची परीक्षा पास करू शकता. तुम्ही आपल्या शहरात किंवा गावात राहून देखील यूपीएससीचा अभ्यास करू शकता. आज केवळ सेल्फ स्टडीच्या जोरावर अनेक उमेदवार UPSC परीक्षा पास झालेले आपण बघतो. पण तुम्हाला असं वाटत असेल की, तुम्ही फक्त घरी बसून अभ्यास करुन परीक्षेची पूर्ण तयारी करू शकत नाही; तर मग तुम्ही कोचिंग क्लास लावू शकता.
लेखन आणि वाचनाचा सराव वाढवा
आपल्याला लेखनाबरोबरच वाचनाचा सराव करावा लागेल कारण पूर्व परीक्षा झाल्यानंतर आपल्याला मुख्य परीक्षा द्यायची आहे. सुमारे 200 शब्दांत कोणत्याही विषयावर थोडक्यात (How to Prepare for UPSC) लिहिण्याचा प्रयत्न करा. आपण जितके अधिक लिहायचा प्रयत्न कराल तितकी आपली लेखन शैली सुधारेल आणि व्याकरणात कमी चुका होतील.
करंट अफेयर्स महत्त्वाचे
UPSC परीक्षेत करंट अफेयर्सची माहिती असणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे रोज वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावा. त्यात येणारा संपादकीय स्तंभ तुमच्यासाठी उपयोगी ठरेल. वर्तमान पत्र आणि लेख वाचन वगळून कोणीही UPSC पास होवू शकत नाही. दररोज वर्तमान पत्र आणि लेख (How to Prepare for UPSC) वाचन केल्याने UPSC ची 80 % हून अधिक तयारी होते. म्हणून दररोज वर्तमान पत्र आणि लेख वाचनसाठी दोन ते तीन तास देणे अनिवार्य आहे. यासाठी तुम्ही एक राष्ट्रीय स्तरावरील आणि एक स्थानिक स्तरावरील वर्तमान पत्र वाचन केले पाहिजे. यामुळे तुमची मुलाखतीची तयारी होण्यास निश्चित मदत होईल.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com