करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जॉबच्या (How to Get Job) मागे धावताना अनेकांची दमछाक होते. त्यात तुम्हाला मनासारखी नोकरी मिळवायची असेल तर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सध्या मनासारखं जॉब मिळवणे हे काम कठीण होवून बसले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी जॉबसाठी अर्ज केल्यानंतर ही कित्येकांच्या पदरी निराशा पडते. मग वारंवार जॉबचा शोध सुरु होतो. या पाठशिवणीच्या खेळात अनेकवेळा तरुण-तरुणी हतबल होतात. विचार नकारात्मक होतात. यामधून येणारी हतबलता दूर करण्यासाठी आज आम्ही तुमची मदत करणार आहोत.
वारंवार शोधूनही तुम्हाला जर मनासारखा जॉब मिळत नसेल तर निराश न होता तुमचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. जॉब मिळवण्यासाठी तुम्ही वापरत असलेली स्ट्रॅटेजी बदला. वेगळी स्ट्रॅटेजी अवलंबून पहा; तुम्ही नक्कीच यश मिळवाल.
आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्ट्रॅटेजीबद्दल सांगणार आहोत. ज्यांचा अवलंब करुन तुम्ही जॉब सोप्या पद्धतीने जॉब मिळवू शकता.
ऑनलाईन जॉब प्लॅटफॉर्मची मदत घ्या (How to Get Job)
अनेकवेळा सर्च करुनही तुम्हाला मनासारखा जॉब मिळत नाही तेव्हा नोकरी शोधण्याची तुमची पद्धत चुकीची असू शकते. त्यामुळे तुम्ही तुमची नोकरी शोधण्याची पद्धत बदलणे गरजेचे आहे. ऑफलाईन नोकरी शोधण्याच्या पर्यायासह तुम्ही ऑनलाईन नोकरी प्लॅटफॉर्मवर नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमची नोकरी मिळवण्याची संधी अनेक पटींनी वाढेल. यासाठी तुम्ही ऑनलाईन जॉब पोर्टलवर तुमचं रजिस्ट्रेशन करा आणि तुमच्या मोबाईलमध्ये जॉब अलर्ट सेट करुन ठेवा; जेणेकरून तुम्हाला नोकरी संदर्भातल्या महत्वाच्या नोटिफिकेशन्स मिळत राहतील.
स्वतःमध्ये जे कौशल्य आहे त्यावर काम करा
आपण सर्वजण आपल्या क्षेत्राशी निगडीत असलेली शैक्षणिक पात्रता प्राप्त करतो. मात्र अनेकदा असं होतं की आपण आपल्या स्किल्सवर काम करायला विसरतो. त्यामुळे, नोकरी (How to Get Job) मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या स्किल्सवर काम करणे महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही तुमच्या क्षेत्राशी निगडीत असलेले ऑनलाईन कोर्स किंवा वर्कशॉप्स करु शकता.
तुमचा Resume सतत अपडेट करा
जॉब शोधत असताना तुमचा Resume महत्वाची भूमिका बजावतो. वारंवार सर्च करूनही चांगला जॉब मिळत नसेल तर यामागे तुमचा Resume अपडेट नसणे हे देखील मुख्य कारण असू शकते. अनेक जण Resume अपडेट न करता तोच Resume अनेक कंपन्यांमध्ये पाठवतात. प्रत्येक कंपनी आणि त्या ठिकाणावरील नोकरीशी संबंधित वेगवेगळ्या आवश्यकता असू शकतात. त्यामुळे, कोणत्याही कंपनीत जॉबसाठी अप्लाय करण्यापूर्वी तुमचा Resume अपडेट करणे महत्वाचे आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com