How to Become Excise Inspector : हे आहे देशातील शक्तिशाली पद; तुम्हाला व्हायचंय ‘एक्साइज इन्स्पेक्टर’? पहा पात्रता,परीक्षा आणि पगाराविषयी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नव्या पिढीची करिअर (How to Become Excise Inspector) विषयी वेगवेगळी मते आहेत. काहींना मेडिकल, इंजिनिअरिंग करायचंय तर काहींना रेल्वे, पोलिस दल, शिक्षण किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये जायचंय. अनेकजण देशसेवेसाठी देखील उत्सुक असतात. पण असेही काही तरुण आहेत ज्यांना देशातील आर्मी, नेव्ही, एअर फोर्स या विभागासह देशाच्या इतर शक्तींमध्ये सामील होऊन देशाची सेवा करायची आहे. यापैकीच एक पद आहे उत्पादन शुल्क निरीक्षक म्हणजेच Excise Inspector. हे पद केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते आणि हे एक अतिशय शक्तिशाली पद मानले जाते. या पदापर्यंत पोहचण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते, तसेच वय मर्यादा, पात्रता, मिळणारा पगार हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा…

द्यावी लागते SSC CGL परीक्षा
अबकारी निरीक्षक म्हणजेच Excise Inspector होण्यासाठी तुम्हाला संयुक्त पदवी स्तर परीक्षेस बसावे लागेल. CGL परीक्षा दरवर्षी आयोजित केली जाते आणि ती आयोजित करण्याची जबाबदारी स्टाफ सिलेक्शन कमिशनला म्हणजेच SSC वर देण्यात आली आहे.
अशी होते परीक्षा
SSC CGL परीक्षा दोन टप्प्यांत घेतली जाते. टियर-1 आणि टियर-2 या दोन टप्यात ही परीक्षा होते.
टियर 1 परीक्षेत 100 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नासाठी २ गुण दिलेले आहेत. टियर 1 मध्ये जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिट्यूड, इंग्लिश (How to Become Excise Inspector) कॉम्प्रिहेन्शन या विषयांमधून प्रत्येकी 25 प्रश्न विचारले जातील. प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी 1 तासाचा वेळ दिला जातो. सर्व उमेदवारांसाठी पेपर १ अनिवार्य आहे. टियर-1 परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार टियर-2 परीक्षेत सहभागी होऊ शकतात.

इतकी आहे वयमर्यादा (How to Become Excise Inspector)
Excise Inspector होण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवी पूर्ण केलेली असावी. उमेदवाराचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. ही पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना या पदावर निवड होण्यासाठी SSC CGL परीक्षा पास व्हावी लागते.
किती मिळतो पगार?
उत्पादन शुल्क निरीक्षक पदांवर नियुक्त केलेल्या उमेदवारांना केंद्र सरकारकडून वेतन स्तर-7 नुसार दरमहा रु. 44,900 ते रु. 1,42,400 पर्यंत पगार दिला जातो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com