करिअरनामा ऑनलाईन । देशाच्या सर्वोच्च न्यायालयात (How to Become a Supreme Court Law Clerk) कायदा लिपिकाच्या रिक्त पदांसाठी भरती होत असते. जर तुम्हालाही सर्वोच्च न्यायालयात लिपीक पदावर सरकारी नोकरी मिळवायची असेल,तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, लिपीक पदावर नोकरी मिळवण्यासाठी कोणते पात्रता निकष पूर्ण करणे अनिवार्य आहे याविषयी…
सर्वोच्च न्यायालयात काम करणे करिअरच्या दृष्टिकोनातून महत्वाचे मानले जाते. सर्वोच्च न्यायालयात अनेक पदे असली तरी ‘विधी लिपिक’ हे पद सर्वोत्तम मानले जाते. सुप्रीम कोर्टात वेळोवेळी या पदासाठी रिक्त जागेच्या जाहिराती सोडल्या जातात. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना पात्रता निकष पूर्ण करणे अनिवार्य आहे, ज्याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे मिळू शकते.
कायदा लिपिक (Law Clerk) पदांसाठी आवश्यक पात्रता –
सर्वोच्च न्यायालयात कायदा लिपिक पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कायद्यातील पदवी घेतली असणे आवश्यक आहे. या पदासाठी (How to Become a Supreme Court Law Clerk) अर्ज करताना उमेदवाराचे किमान वय 20 वर्षांपेक्षा कमी आणि 32 वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार विहित वर्षांच्या संख्येनुसार उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाते.
अशी होते निवड (How to Become a Supreme Court Law Clerk)
सुप्रीम कोर्टात लॉ क्लर्क पदावर निवड होण्यासाठी उमेदवारांना तीन टप्प्यातील प्रक्रियेतून जावे लागेल.
1. पहिल्या टप्यात उमेदवारांना कायदा आणि त्याची समज यावर आधारित बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील.
2. जे उमेदवार या परीक्षेत यशस्वी होतील त्यांना भाग २ च्या परीक्षेत सहभागी व्हावे लागेल. विषयवार लेखी परीक्षा भाग २ मध्ये घेतली जाईल.
3. दुसऱ्या टप्प्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांना शेवटी भाग 3 टप्प्यात (मुलाखत प्रक्रिया) सहभागी व्हावे लागेल.
सर्व टप्प्यांत यशस्वी झालेल्या उमेदवारांना अंतिम गुणवत्ता यादीत स्थान दिले जाईल आणि त्यांना रिक्त पदांवर नियुक्ती दिली जाईल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com