High Salary Jobs : काय सांगता!! ‘या’ सरकारी नोकऱ्या मिळवून देतील लाखात पगार; अर्ज प्रक्रिया झाली सुरु 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीत सामील (High Salary Jobs) होण्याची अनेकांची इच्छा असते. या नोकरीतून मिळणारी करिअरच्या बाबतीतील सुरक्षितता, सोयी सुविधा, भत्ते यांचा विचार केला तर प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळवून आयुष्यात सेट होण्यासाठी धडपड सुरु असते. जर तुम्ही सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे. सरकारी नोकरीतून तुम्हाला महिन्याकाठी लाख रुपये कमवायचे असतील तर इथे आम्ही तुम्हाला तगड्या पगाराच्या सरकारी नोकऱ्यांची यादी देत आहोत. सध्या या सरकारी विभागांमध्ये भरती सुरु आहे. त्यामुळे तुम्ही इथे अर्ज करू शकता.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सध्या १९२ पदांसाठी भरती (High Salary Jobs) सुरू आहे. यामध्ये भरल्या जाणाऱ्या काही पदांचे वेतन एक लाख रुपयांपेक्षा जास्त असू शकते. माहिती तंत्रज्ञान, जोखीम व्यवस्थापक, आर्थिक विश्लेषक, कायदा अधिकारी, क्रेडिट अधिकारी, सुरक्षा अधिकारी, ग्रंथपाल इत्यादी पदांसाठी इथे भरती होणार आहे.

AIIMS भोपाळ भरती 
इथे नॉन फॅकल्टीच्या 357 पदांसाठी भरती सुरू आहे. काही पदांचे पगार दरमहा एक लाख रुपयांपर्यंत असू शकतात.
BEML भरती
BEML (Bharat Earth Movers Limited) मध्ये कार्यकारी पदांसाठी भरती सुरू आहे. येथे निवड झाल्यास तुम्हाला 1 लाख ते 3 लाख रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो.

AIIMS गोरखपूर भरती 
AIIMS गोरखपूर अंतर्गत 142 विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. येथे काही पदांचे वेतन दरमहा एक लाख रुपयांपेक्षा जास्त असू शकते.
HAL भरती (High Salary Jobs)
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये (HAL) अनेक पदांसाठी भरती सुरू आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे. येथे निवड झाल्यास पदानुसार दरमहा 40,000 ते रु 2,40,000 पर्यंत पगार मिळू शकतो.

वरील सर्व नोकऱ्या तुम्हाला जवळपास एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक पगार कमावण्याची संधी देतात.  परंतु पगार ठरवण्यात अनेक घटकांचा हातभार लागतो. त्यामुळे तुमच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार योग्य नोकरी निवडणे महत्त्वाचे आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com