Health Education : हृदयविकाराच्या झटक्यामुळे येणारे मृत्यू रोखण्यासाठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मिळणार CPR ट्रेनिंग

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात (Health Education) तरुणांसह अबालवृध्दांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे अनेकवेळा अचानक मृत्यू ओढावल्याची प्रकरणे वाढत आहेत. सर्वांसाठीच ही बाब चिंतेची बनली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अलीकडेच CPR म्हणजेच कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशनमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. हृदयविकाराच्या स्थितीत रुग्णाचा जीव वाचवता यावा; हा यामागे मुख्य हेतू आहे.

बेसिक लाइफ सपोर्टचे (BLS) प्रशिक्षण देण्याच्या सूचना
आता UGC ने देशातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यांना डॉक्टर आणि वैद्यकीय मदतीने सर्व विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी यांना बेसिक लाइफ सपोर्टचे (Health Education) प्रशिक्षण देण्यास सांगितले आहे. UGC ने म्हटले आहे की देशातील फक्त 0.1 टक्के लोकांना BLS तंत्रज्ञानाबाबत माहिती आहे; त्यामुळे आता या प्रशिक्षणाचा मोठ्या प्रमाणावर शिक्षण क्षेत्रात समावेश व्हायला हवा. हे प्रशिक्षण जितके अधिक लोकांना मिळेल तितके अधिक जीव वाचवणे शक्य होणार आहे.

CPR चा अर्थ काय? (Health Education)
आजारी व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेण्याआधी जिवंत ठेवण्यासाठी हृदयाच्या स्नायूवर दबाव आणण्यासाठी सीपीआर (Cardiopulmonary Resuscitation) हे एक विशेष तंत्र वापरले जाते. जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो, तेव्हा हृदय मेंदू आणि फुफ्फुसांसह उर्वरित शरीरात रक्त पंप करू शकत नाही. अशा गंभीर परिस्थितीत CPR तंत्र वापरल्यास रुग्णाचा जीव वाचण्यात मदत होवू शकते.

कार्डियाक अरेस्ट येताना पहिली 3 ते 10 मिनिटे महत्त्वाची
एका अहवालातून असे समोर आले आहे की, देशात दरवर्षी सुमारे 10 लाख लोकांचा (Health Education) मृत्यू फक्त हृदयविकाराच्या झटक्याने होतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कार्डियाक अरेस्टच्या बाबतीत सुरवातीची 3 ते 10 मिनिटे खूप महत्त्वाची असतात. त्यामुळे एक प्रशिक्षित व्यक्तीने पीडित व्यक्तीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केल्यास सुमारे साडे3 लाख लोकांचे प्राण वाचू शकतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com