करिअरनामा ऑनलाईन । गेली अनेक महिने ग्रामसेवक भरतीची वाट पाहणाऱ्या (Gramsevak Bharti) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्हा परिषदेतर्फे ग्रामविकास विभाग अंतर्गत तब्बल 10 हजार पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासंदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. प्रत्येक गावात ग्रामसेवक हा महत्वाची जबाबदारी संभाळत असतो. सरकारी नोकरीसोबतच गावाची सेवा करण्याची संधी या पदावरील व्यक्तीला मिळते.
ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सर्व संवर्गाची (वाहनचालक व गट- ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त (Gramsevak Bharti) पदांच्या ८०% मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यात येणार आहे. सदर मान्यता ही वित्त विभागाच्या निर्देशानुसार दि. १५ ऑगस्ट, २०२३ पर्यंत लागू राहील. त्यापुढील भरती प्रक्रिया वित्त विभागाचा शासन निर्णय दि. ३० सप्टेंबर, २०२२ नुसार सुधारित आकृतिबंध शासनाने मान्य केल्यावरच करता येणार आहे.
जिल्हा परिषदांतील गट-क मधील सर्व संवर्गाची (वाहनचालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून) रिक्त पदे संवर्गनिहाय आरक्षण नियमानुसार निश्चित करून जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्तरावर जिल्हा निवड मंडळामार्फत परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक देण्यात आले आहे.
काही महत्वाच्या तारखा – (Gramsevak Bharti)
१ ते ७ फेब्रुवारी २०२३ दरम्यान पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर पुढे २२ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतील. २३ फेब्रुवारी ते १ मार्च २०२३ दरम्यान अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. तर २ ते ५ मार्च २०२३ दरम्यान पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे.
६ ते १३ एप्रिल २०२३ दरम्यान पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तर १४ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत ऑनलाइन/ऑफलाइन माध्यमातून परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे.
१ मे ते ३१ मे या कालावधीत अंतिम निकाल आणि पात्र उमेदवारांना नियुक्तीचे आदेश दिले जाणार आहेत.
या वेळापत्रकाचे सर्व जिल्हा परिषदांना पालन करावे (Gramsevak Bharti) लागणार आहे. त्याकरिता रिक्त पदे (एकूण रिक्त पदांच्या ८०% मर्यादेपर्यंत), त्यांची आरक्षण निश्चिती, उमेदवारी अर्ज मागविणे, सदर परीक्षेच्या आयोजनासाठी कंपनी निवडणे (आवश्यक असल्यास), परीक्षा घेण्यासंबंधीची सर्व जबाबदारी हीजिल्हा निवड मंडळाची व जिल्हा परिषदेची असेल.
महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाइट www.maharashtra.gov.in वर याचा अधिक तपशील देण्यात आला आहे. त्याचा संकेताक २०२२१११५११२३०३६७२० असा आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com