Government Jobs : महाराष्ट्र शासनाच्या मृदा जलसंधारण विभागात होणार तब्बल 670 पदांवर भरती; डिप्लोमाधारक/ इंजिनियर्ससाठी मोठी संधी!!

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागांतर्गत (Government Jobs) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून राज्यस्तर व जिल्हा परिषदस्तर यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील तब्बल 670 रिक्त पदे भरली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया TCS द्वारे राबविण्यात येणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2024 आहे.

संस्था – मृद व जलसंधारण विभाग
भरले जाणारे पद – जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित)
पद संख्या – 670 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी 2024

वय मर्यादा –
खुल्या प्रवर्गासाठी कमाल – ३८ वर्षे
मागासवर्गीयांसाठी – ४३ वर्षे
दिव्यांग उमेदवारांसाठी – ४५ वर्षा पर्यंत
पात्र खेळाडुंसाठी – ४३ वर्षा पर्यंत
अनाथ उमेदवारांसाठी – ४३ वर्षा पर्यंत
अर्ज फी – (Government Jobs)
अमागास – रु.१०००/-
मागासवर्गीय / आ.दु.घ./अनाथ / दिव्यांग – रु./-९००
(सूचना – उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतीरीक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरीक्त असतील. तसेच परीक्षा शुल्क ना-परतावा (Non Refundable) आहे.)

Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Government Jobs)
1. जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित) उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली तीन वर्षे कालावधीची स्थापत्य अभियात्रीकी मधील पदविका (Diploma in Civil Engineering) किंवा पदवी (Degree in Civil Engineering) किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणुन घोषीत केलेली अर्हता प्राप्त केली असावी.
मिळणारे वेतन – ४१, ८००/- ते १,३२,३००/- रुपये दरमहा
आवश्यक कागदपत्रे –
1. एस.एस.सी. अथवा तत्सम शैक्षणीक अर्हता
2. वयाचा पुरावा (Government Jobs)
3. शैक्षणीक अर्हता इत्यादीचा पुरावा
4. सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्या बाबतचा पुरावा
5. आर्थीकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्या बाबतचा पुरावा
6. वैध नॉन- क्रिमीलेअर प्रमाणपत्र (Government Jobs)
7. पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
8. खेळाडुसाठीच्या आरक्षणा करिता पात्र असल्याचा पुरावा
9. अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
10. विवाहीत स्त्रीयांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा
11. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन

काही महत्वाच्या तारखा –
Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://swcd.maharashtra.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com