Government Job : पुण्याच्या कॅन्टोन्मेंट बोर्ड अंतर्गत नवीन भरती; थेट द्या मुलाखत अन् मिळवा 60 हजार पगार

करिअरनामा ऑनलाईन । कॅन्टोन्मेंट बोर्ड, पुणे अंतर्गत (Government Job) सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. पात्र उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – कॅन्टोन्मेंट बोर्ड, पुणे
भरले जाणारे पद – सहाय्यक वैद्यकीय अधिकारी
पद संख्या – 02 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा – 65 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत (Government Job)
मुलाखतीची तारीख – 31 ऑक्टोबर 2023
मुलाखतीचा पत्ता – निवासी वैद्यकीय अधिकारी, SVP CGH, गोळीबार मैदान, पुणे-01

आवश्यक शैक्षणिक पात्रता – MBBS with valid MMC/ MCI Registration
मिळणारे वेतन – Rs.60,000/- दरमहा
अशी होणार निवड – (Government Job)
1. या भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. इच्छुक उमेदवारांनी अर्जासह वरील तारीख आणि वेळेस मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहायचे आहे.
3. मुलाखतीची तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://pune.cantt.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com