Google Courses : गुगल ने लॉंच केले 4 फ्री कोर्सेस; घरबसल्या मिळवा तगड्या पागाराची नोकरी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धेच्या युगात हजारो तरुणांचे शिक्षण (Google Courses) पूर्ण होत आहे मात्र नोकऱ्या मोजक्याच तरुणांना मिळत आहेत. अनेक तरुण नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असतात.

मात्र आजच्या युगात स्पर्धा खूप आहे. सरकारी सोडाच पण खासगी क्षेत्रातही नोकरी मिळणे खूप कठीण झाले आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी गुगलने असे 4 विनामूल्य कोर्स आणले आहेत जे कोर्स तुम्हाला हमखास नोकरी देवू शकतात.

गुगलने लॉंच केले 4 मोफत ऑनलाइन फ्री कोर्सेस

जगातील सर्वात मोठी कंपनी गुगलने तरुणांसाठी खास ऑनलाइन (Google Courses) कोर्सेस आणले आहेत. तरुण वर्ग यापैकी एक कोर्स करून नोकरी मिळवू शकतो. हे कोर्स विनामूल्य केले जाऊ शकतात. तसेच कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र देखील देण्यात येते.

गुगलकडून मिळालेल्या प्रमाणपत्रामुळे तुम्हाला देश-विदेशातील मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळू शकते. त्यामुळे गुगलकडून तरुणांना नोकरी मिळवण्याची एक चांगली संधी निर्माण झाली आहे.

गुगलकडून या 4 मोफत ऑनलाइन अभ्यासक्रमांमध्ये डिजिटल मार्केटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि व्यवसायाशी संबंधित अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

1. डिजिटल मार्केटिंग कोर्स (Google Courses)

आजकाल सर्व जगच डिजिटल झालं आहे. गुगलकडून तुम्हाला डिजिटल मार्केटिंग कोर्स करण्याची संधी दिली जात आहे. या कोर्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. हा कोर्स कोणत्याही शिक्षण संस्थेकडून करायचा झाल्यास त्यासाठ लाखो रुपये द्यावे लागतात.

मात्र गुगलकडून डिजिटल मार्केटिंग कोर्स पूर्णपणे मोफत दिला जात आहे. तुम्ही घरबसल्या हा डिजिटल मार्केटिंग कोर्स तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या मदतीने पूर्ण करू शकता. हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला गुगलकडून प्रमाणपत्र दिले जाईल.

2. आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोर्स

येणारा काळ आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा आहे आणि सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप वेगाने वाढत आहे. आज आर्टिफिशियल इंटेलिजेंस एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने (Google Courses) बहुतेक काम पूर्ण केले जात आहे. चॅटजीपीटी हे त्याचे प्रमुख उदाहरण आहे.

Google स्वतः आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) तंत्रज्ञानावर काम करत आहे, नुकतेच Google ने Google Bard नावाचे स्वतःचे AI टूल देखील आणले आहे. तुम्हालाही आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मध्ये स्वारस्य असल्यास, तुम्ही Google ने ऑनलाइन सुरू केलेला आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोर्स विनामूल्य करू शकता.

3. मशीन लर्निंग कोर्स

हा कोर्स गुगलकडून पूर्णपणे मोफत दिला जात आहे. मशीन लर्निंग कोर्स तुम्ही हा कोर्स केल्यास तुम्हाला भारतातील आणि परदेशातील विविध कंपन्यांमध्ये फ्रीलांसर किंवा पूर्णवेळ कर्मचारी म्हणून नोकरी मिळू शकते.

या कोर्सनंतर तुम्हाला घरबसल्या कोणत्याही खाजगी (Google Courses) कंपनीत नोकरी मिळू शकते. तसेच तुम्हाला नोकरी मिळाल्यानंतर लाखो रुपये पगार मिळू शकतो.

4. व्यवसाय अभ्यासक्रम (Google Courses)

सध्या सर्व व्यवसाय ऑनलाइन होत आहेत. सर्व कंपन्या D2C (डायरेक्ट-टू-कंझ्युमर) द्वारे त्यांची उत्पादने विकत आहेत. त्यामुळे ऑनलाइन व्यवसायात मोठी भर पडली आहे.

अशा परिस्थितीत, गुगल फ्री बिझनेस कोर्समध्ये (Google Courses) तुम्हाला बिझनेस स्ट्रॅटेजी, लोकल मार्केटिंग, ईमेल मार्केटिंग, ई कॉमर्स, डी2सी या सर्व गोष्टी शिकवल्या जातात.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com