नवी दिल्ली | करोना लोकडाऊनच्या काळात UPSC आणि इतर परीक्षेच्या विद्यार्थ्यांनाही मोठा फटाका बसला. भितीदायक वातावरणामध्ये परीक्षा द्याव्या लागल्या. यामुळे मुलांना एक प्रयत्न वाढवून मिळावा यासाठी विद्यार्थ्यांनी मागणी केली होती. त्यावर केंद्र शासनाने निर्णय घेतला असून, ऑक्टोबर 2020 मध्ये ज्या विद्यार्थ्याने आपला शेवटचा अटेम्प्ट दिला त्यांना एक अटेम्प्ट वाढवून मिळणार आहे.
यूपीएससीच्या यावर्षी येणाऱ्या नागरी सेवा परीक्षासाठी हा वाढीव अटेम्प्ट लागू असेल. त्यानंतर पुढील परिक्षेकरीता ही सुविधा उपलब्ध नसेल. खुल्या गटातील विद्यार्थी हे 32 वयापर्यंत 6 वेळा परीक्षा देऊ शकतात. तर ओबीसी विद्यार्थी वयाच्या 35 पर्यंत 9 वेळा परीक्षा देऊ शकतो. आणि एससी व एसटी प्रवर्गातील मुले हे वयाच्या 37 पर्यंत अमर्यादित वेळा परीक्षा देऊ शकतात.
कोरोनामुळे 31 मे 2020 रोजी होणारी परीक्षा ही 4 ऑक्टोबर 2020 ला घेण्यात आली. जवळपास 4.80 लाख वियार्थी या परीक्षेला बसले होते. मुख्य परीक्षा 8-17 जानेवारी दरम्यान घेतली गेली होती. यासाठी देशभरातून जवळपास 10,000 विद्यार्थी पूर्व परीक्षेतून निवडले गेले होते. यावर्षीचे नागरी सेवा परीक्षेचे नोटिफिकेशन हे 10 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे.