GK Updates : भारतीय नोटेवर गांधीजींचा फोटो कधी छापण्यात आला? माहित आहे का?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

प्रश्न 1 : असं कोणतं राज्य आहे, ज्या राज्याला अन्य 8 राज्यांच्या सीमांनी (GK Updates) घेरलं आहे ?

उत्तर : उत्तर प्रदेश । सीमा :- उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार आणि दिल्ली या राज्यांना लागून आहे…

प्रश्न 2 : भारतातलं असं कोणतं राज्य आहे, जे कधीचं इंग्रजांचं गुलाम झालं नव्हतं ?

उत्तर : गोवा

गोव्यावर इंग्रजांचं नव्हे पोर्तुगीजांचं राज्य होतं. 19 डिसेंबर ही देशाच्या इतिहासातील ती तारीख आहे, ज्या दिवशी भारतीय लष्कराने सुमारे 450 वर्षांच्या पोर्तुगीज साम्राज्यापासून गोवा, दमण आणि दीव मुक्त केलं, ते वर्ष होते 1961.
18 डिसेंबर 1961 रोजी भारतीय सैन्याने गोव्यात ऑपरेशन विजय सुरू केलं आणि 19 डिसेंबर रोजी पोर्तुगीज सैन्याने आत्मसमर्पण केलं.

प्रश्न 3 : 1947 मध्ये स्वातंत्र्याच्या वेळी भारतात किती (GK Updates) राज्ये होती. उर्वरित राज्यांची निर्मिती कधी व कशी झाली ?

उत्तर : राज्यघटनेतील 7 वी घटनादुरुस्ती राज्यांच्या पुनर्रचनेशी संबंधित आहे. राज्य पुनर्रचना कायदा 1956 नुसार, घटनेत 7 वी दुरुस्ती करण्यात आली आणि मूळ घटनेतील अ, ब, क आणि ड या चार श्रेणी रद्द करून 14 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशांची स्थापना करण्यात आली.

तर राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष फजल अली यांनी भारतीय संघराज्याचे 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याची सूचना केली.
1 मे 1960 रोजी मराठी आणि गुजराती भाषिक लोकांच्या संघर्षामुळे मुंबई राज्याचे विभाजन करून महाराष्ट्र आणि गुजरात नावाची दोन राज्ये निर्माण झाली.
अशा प्रकारे गुजरात हे 15 वे राज्य बनलं.

नागालँड 1962 मध्ये आसाममधून वेगळे झालं आणि भारताचे 16 वे राज्य बनलं.

1966 मध्ये, हरियाणा हे पंजाबमधून हिंदी भाषिक राज्यांपासून वेगळं झालं आणि ते 17 वे राज्य बनलं.

हिमाचल प्रदेश 25 जानेवारी 1971 रोजी 18 वे राज्य बनलं.

मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालय ही 21 जानेवारी 1972 रोजी अनुक्रमे 19वी, 20वी आणि 21वी राज्ये बनवण्यात आली.

1974 मध्ये 35 व्या घटनादुरुस्तीद्वारे सिक्कीमला भारताच्या सह – राज्याचा दर्जा देण्यात आला आणि 1975 मध्ये 36 व्या घटनादुरुस्तीद्वारे ते पूर्ण विकसित राज्य बनलं. 1986 मध्ये, मिझोराम (GK Updates) हे 23 वे राज्य आणि अरुणाचल प्रदेश 24 वे राज्य बनलं. आणि 30 मे 1987 रोजी गोवा हे 25 वे राज्य बनलं.

1 नोव्हेंबर 2000 रोजी, छत्तीसगड हे 26 वे राज्य म्हणून मध्य प्रदेशातून वेगळे झालं.

9 नोव्हेंबर 2000 रोजी, उत्तराखंड हे 27 वे राज्य म्हणून उत्तर प्रदेशमधून वेगळे झालं.

15 नोव्हेंबर 2000 रोजी झारखंड बिहारपासून वेगळे होऊन 28 वे राज्य बनलं.

तेलंगणाला 29 व्या राज्याचा दर्जा मिळाला आहे. ते 2 जून 2014 रोजी आंध्र प्रदेशातून काढण्यात आलं त्यामुळे,
सध्या भारतात 29 राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेशांसह एकूण 36 राज्ये आहेत.

प्रश्न 4 : POLICE या अक्षराचा फुल फॉर्म तुम्हाला माहिती आहे का ?

उत्तर : P – Polite (सभ्य)
O – Obedient (निष्ठावंत)
L – Literate (साक्षर,शिकलेला )
I – Intelligence (बुद्धिमान)
C – Clever (चतुर ,चलाक)
E – Elite (सर्वोत्तम)

प्रश्न 5 : भारतीय नोटेवर गांधीजींचे फोटो कधी छापण्यात आला ?

उत्तर : 1969 मध्ये, भारतीय रिझर्व्ह बँकेने महात्मा गांधींचा फोटो (GK Updates) असलेली 100 रुपयांची पहिली नोट जारी केली. यामध्ये गांधीजींना सेवाग्राम आश्रमासमोर बसलेले दाखवण्यात आले आहे.

… तर ऑक्टोबर 1987 मध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 500 रुपयांची नोट जारी केली ज्यामध्ये महात्मा गांधींचे हसरे चित्र होते. त्यावर सिंहाची राजधानी आणि अशोक स्तंभावर वॉटर मार्क होते.

प्रश्न 6 : नवी दिल्लीपूर्वी भारताची राजधानी कोठे होती ?

उत्तर : नवी दिल्लीपूर्वी 1911 मध्ये भारताची राजधानी कोलकत्ता होती. ती रॉयल कॅपिटल ब्रिटीश भारताची राजधानी म्हणून दिल्लीचा पाया महाराजा जॉर्ज पंचम यांनी 1911 च्या राज्याभिषेक दरबारात घातला अन् त्यानंतर दिल्लीला भारताची राजधानी म्हणून ओळखलं जातं.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com