करिअरनामा ऑनलाईन। तुम्हाला गुगलमध्ये नोकरी हवी (GK Updates) असल्यास मुलाखतीची तयारी सुरू करा. गुगलमध्ये नवीन उमेदवारांची भरती प्रक्रिया दीर्घकाळ चालते. अशा परिस्थितीत कॉल लेटर येण्याची वाट न पाहता मुलाखतीच्या टप्प्याची तयारी करणं योग्य ठरतं. यामुळे काय होतं; जर तुम्ही शॉर्टलिस्ट झाला तर तुमचा वेळ वाया जाणार नाही.
गुगलची मुलाखत फेरी इतर कंपन्यांच्या तुलनेत खूपच अवघड मानली जाते. भरती प्रक्रियेप्रमाणे, मुलाखत देखील अनेक फेऱ्यांमध्ये होते. जर तुम्ही Google मध्ये नोकरीसाठी अर्ज करत असाल तर आम्ही इथे काही प्रश्नांची यादी देत आहोत; या प्रश्नांच्या तयारीचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल.
Google Background Questions (GK Updates)
1. तुम्ही तुमच्याबद्दल काही सांगू शकता का?
2. तुमची कार्यशैली कशी आहे?
3. पुढील 5 वर्षांसाठी तुमची करिअरची उद्दिष्टे कोणती आहेत?
4. तुमच्या कमकुवतपणाबद्दल आणि सामर्थ्याबद्दल सांगा.
5. तुमच्या पुढील नोकरीकडून तुम्हाला काय अपेक्षित आहे?
6. या नोकरीसाठी तुम्ही स्वतःला कसे पात्र समजता?
Google Situational Questions
1. आम्हाला एका घटनेबद्दल सांगा ज्यामध्ये तुम्ही आव्हानांवर मात केली आणि चांगले परिणाम दिले. यामध्ये तुमचे आव्हान, अडचण, ध्येय आणि निकाल या सर्व गोष्टी सांगा.
2. एखाद्या प्रकल्पात तुम्ही चूक केली असेल त्या घटनेबद्दल आम्हाला सांगा. तुम्ही त्यात सुधारणा कशी केली आणि तुमच्या वरिष्ठांना किंवा टीमला त्याबद्दल कसे सांगितले?
3. तुम्हाला कधी एखाद्या प्रकल्पासाठी नवीन (GK Updates) कौशल्य शिकावे लागले आहे का? तुमची शिकण्याची प्रक्रिया कशी होती?
4. जर तुम्हाला खूप प्रोजेक्ट्स एकत्र आले तर तुम्ही ते कसे हाताळाल?
5. समजा तुमच्या टीममध्ये 5 लोक आहेत. त्यापैकी 2 टीम वर्कमध्ये फारसे योगदान देत नाहीत. पण जेव्हा हे दोघे कोणतेही काम करतात तेव्हा त्याचा दर्जा उत्तम असतो. अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल?
6. कोणत्या परिस्थितीत तुम्ही एखाद्या समस्येचे निराकरण एकट्याने शोधता आणि कोणत्या परिस्थितीत तुम्ही संघाची मदत घेता?
7. ज्या प्रकल्पासाठी तुम्ही ध्येय ठेवले आहे त्याबद्दल आम्हाला सांगा. ते कसे साध्य करायचे?
8. एखाद्या प्रकल्पादरम्यान तुमचे कधी कोणाशी मतभेद झाले आहेत का? या प्रसंगी तुम्ही परिस्थितीत कशी हाताळली?
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com