करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्रातील अनेक होतकरु तरुण (Foreign Study Scholarship) शिष्यवृत्तीच्या जोरावर पदवीपर्यंत शिक्षण घेतात. याच शिष्यवृत्तीच्या जोरावर ते आयुष्यातील शिक्षणाचा महत्वाचा टप्पा पूर्ण करतात. मात्र अनेकांना शैक्षणिक शिष्यवृत्ती विषयी पुरेशी माहिती नसते. परदेशातील शिक्षणाचा सर्व खर्च पेलवत नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशात जाता येत नाही. यासाठीच आज आम्ही तुम्हाला विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग शिष्यवृत्ती संदर्भात सविस्तर माहिती देणार आहोत.
या विद्यार्थ्यांना लागू होते शिष्यवृत्ती (Foreign Study Scholarship)
1. विद्यार्थी हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असावा.
2. महाराष्ट्रातील विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि पीएचडीसाठी.
3. प्रवेश घेऊ इच्छित असणारे विद्यापीठ THE (Times Higher Education) किंवा QS (Quacquarelli Symonds) या पद्धतीच्या मानांकांमध्ये 200 नंबरच्या आत असावे.
काय आहे योजनेचा उद्देश
विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाने 21 ऑगस्ट 2018८ रोजी घेतला होता.
असा करा अर्ज
1. या शिष्यवृत्ती संदर्भात विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गासाठी असणाऱ्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संकेतस्थळावर जाहिरात उपलब्ध होते. (Foreign Study Scholarship)
2. विद्यार्थ्याने जाहिरातीसोबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या विहित नमुन्यातील अर्ज विभागाच्या पुढील अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करावा.
अधिकृत वेबसाईट – (Foreign Study Scholarship)
1. www.maharashtra.gov.in https
2. mahaeschol.maharashtra.gov.in
3. https://sjsa.maharashtra.gov.in
महत्वाचे –
– प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये या शिष्यवृती अंतर्गत अर्ज मागविण्यात येतात.
– शिष्यवृत्ती देण्याच्या एकूण जागांमध्ये 30 टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत.
शिष्यवृत्ती कोणकोणत्या क्षेत्रासाठी लागू?
1. कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन, विधी, अभियांत्रिकी / वास्तुकला शास्त्र आणि औषधनिर्माण शास्त्र.
2. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना पदव्युत्तरसाठी किंवा पीएचडी अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना, यापूर्वी इतर कोणत्याही राज्य शासनाची अथवा केंद्रशासनाची परदेशी शिष्यवृत्ती घेतलेली नसावी. अन्य प्रशासकीय विभागाच्या परदेशी शिष्यवृत्तीच्या योजनेसाठी अर्ज केलेला नसावा.
आवश्यक वय मर्यादा
1. जाहिरात प्रसिद्ध झालेल्या महिन्याच्या पहिल्या तारखेस उमेदवारांचे वय 35 वर्षापेक्षा जास्त नसावे.
2. पीएच.डी.साठी 40 वर्षे कमाल वयोमर्यादा आहे. (Foreign Study Scholarship)
शिष्यवृत्तीसाठी अटी
1. विद्यार्थ्यांच्या पालकांचे/ कुटुंबाचे व विद्यार्थी नोकरी करीत असल्यास एकूण स्वतःचे उत्पन्न धरून सर्व मार्गांनी मिळणारे मागील आर्थिक वर्षांतील उत्पन्न रुपये ८ लाखापेक्षा जास्त नसावे.
2. विद्यार्थी किंवा पालक किंवा दोन्ही नोकरीत असल्यास आयकर विवरणपत्र, फॉर्म नं 16 व सक्षम प्राधिकारी यांच्याकडील मागील आर्थिक वर्षाचे कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
3. भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान 60 टक्के गुणासंह पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
4. पीएचडीसाठी किमान 60 टक्के गुणासह पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका परीक्षा उत्तीर्ण असावी.
5. या योजनेचा लाभ एकाच कुटुंबातील एका विद्यार्थ्यास फक्त एकदाच घेता येतो.
6. शिक्षणासाठी आवश्यक असलेला कालावधी किंवा त्यापुर्वीच्या कालावधीपर्यंतच परदेशात राहण्याचे हमीपत्र राज्य शासन व परदेशातील भारतीय दूतावासास लिहून द्यावे लागते. (Foreign Study Scholarship)
7. परदेशी शैक्षणिक संस्थांकडून अनकंडिशनल ऑफर लेटर मिळालेले असेल, त्यांनाच ही शिष्यवृत्ती अनुज्ञेय आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com