Foreign Scholarship : मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट!! ‘ही’ शिष्यवृत्ती देणार परदेशात उच्च शिक्षणाची संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आज पार पडलेल्या महत्वाच्या (Foreign Scholarship) मंत्रिमंडळ बैठकीत मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी ‘सयाजीराव गायकवाड – सारथी शिष्यवृत्ती’ योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत दरवर्षी 75 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.

असे आहेत मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय – (Foreign Scholarship)
1. राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर. देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले.
2. मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी ‘सयाजीराव गायकवाड – सारथी शिष्यवृत्ती’ योजना. 75 विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती मिळणार
3. दिंडोरी तालुक्यातील चिमणपाडा आणि त्र्यंबक तालुक्यातील कळमुस्ते येथील प्रवाही वळण योजनांना मान्यता
4. नागपूर येथील मे.शिवराज फाईन आर्ट लिथो वर्क्सच्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेणार
5. सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती, न्यायमूर्ती किंवा (Foreign Scholarship) त्यांचे पती, पत्नी यांना सेवानिवृत्तीनंतरचे लाभ मिळणार.
6. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, गेळे आणि चौकुळ येथील कबूलायतदार गावकर जमिनीबाबत निर्णय.
7. नागपूर कृषि महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय कृषि सुविधा केंद्र उभारणार.
8. मत्स्यबीज उत्पादन आणि मत्स्यबीज संवर्धन केंद्रांचा भाडेपट्टी कालावधी वाढवून आता 25 वर्षे करण्यात आला.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com