पुण्यात अडकलेल्या स्पर्धापरिक्षा विद्यार्थ्यांसाठी खूषखबर; आज पहिली बस सुटणार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पुणे प्रतिनिधी | लाॅकडाउनमुळे राज्यातील विविध भागांत अनेकजण अडकून पडले आहेत. अशांसाठी एसटी बस ची सुविधा करण्यात येणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी दिली होती. त्यानुसार आज पुण्यातून विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी पहिली बस नगरला जाणार असल्याचे समजत आहे. या निर्णयामुळे पुण्यात अडकून पडलेल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची चिंता मिटली आहे.

पुण्यात सुमारे अडीच हजार विदयार्थी वास्तव्यास आहेत. राज्यात अडकलेल्यांना एसटीद्वारे त्यांच्या घरी पोहोचवले जाणार आहे. यासाठी लागणारा प्रवासाचा खर्च  देखील सरकार करणार असल्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. 10 हजार एसटी बसेसने राज्यात अडकलेल्या लोकांना घरी पोहोचवणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितलले आहे.

तसेच या प्रवासाचा खर्च मदत व पुनर्वसन विभाग उचलणार आहे. यासाठी जवळपास 20 कोटी रुपयांच्या वर अपेक्षित खर्च आहे. या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून सुरु होईल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. आज स्वारगेट स्टँड वरून पुण्यात अडकलेल्या स्पर्धापरिक्षा विद्यार्थ्यांसाठी बस निघणार असून त्याची तयारी पूर्ण झाल्याचे ‘एमपीएससी स्टुडंट राईट्स’ चे समनव्यक महेश बडे यांनी सांगितले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार दोन बसेसची व्यवस्था करण्यात आली असून संबंधित विद्यार्थ्यांना त्याबाबत आधी कळवण्यात आले आहे. त्यामुळे इतरांनी कारणाशिवाय गर्दी करु नये असे आवाहन महेश बडे यांनी केले आहे. जशी व्यवस्था होईल तसे विद्यार्थ्यांना त्याबाबत कळवण्यात येणार आहे.

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com