करिअरनामा ऑनलाईन । राज्य शासनाच्या सेवेतील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पार पडण्याची जबाबदारी पुन्हा निवड समित्यांवर सोपविण्यात आली आहे. महापरीक्षा पोर्टल पद्धती पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षे बाहेरील राज्यशासनाच्या सेवेतील गट ब (अराजपत्रित) आणि क संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पूर्वी दुय्यम सेवा निवड समित्यांची स्थापना करण्यात आली होती.भाजप सरकारच्या काळात शासकीय सेवेतील ७२ हजार रिक्त पदे भरण्याची घोषणा करण्यात आली होती.त्यासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षाकरिता महापरीक्षा पोर्टल या पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु त्यावेळी विविध पदांच्या भरती प्रक्रियेत कमालीचा गोंधळ केल्याच्या तक्रारी आल्या होत्या, त्यामुळे राज्यात सत्ताबद्दल झाल्यानंतर महापरीक्षा पोर्टल रद्द करून पूर्वीच्या पद्धतीने भरती प्रक्रिया राबवावी,अशी मागणी करण्यात आली.
महापरीक्षा पोर्टल पद्धतीला बरेच आक्षेप घेण्यात आल्यामुळे ही प्रक्रिया रद्द करून पूर्वीच्या पद्धतीने भरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी पुढे आली.त्यानुसार ही पद्धत बदलून आता निवड समित्यांच्या देखरेखीखाली नोकरभरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com