Farmer Success Story : ST महामंडळाची ची नोकरी सांभाळून शेतीतील यशस्वी प्रयोग; धुळ्याची केळी थेट इराणच्या बाजारात

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । शेतकऱ्यांना सातत्यानं कधी अस्मानी तर (Farmer Success Story) कधी सुलतानी संकटांचा सामना करावा लागतो. मात्र, या संकटाचा सामना करत काही शेतकरी चांगले उत्पादन घेताना दिसतात. उच्चशिक्षित युवक देखील शेतीत वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत. असाच एक वेगळा प्रयोग धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील अर्थे खुर्द येथील युवा शेतकरी सत्यपाल गुजर यांनी केला आहे. सत्यपाल गुजर यांनी आधुनिक पद्धतीनं केळीची लागवड करत युवकांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी इराणमध्ये केळीची निर्यात करून आपलं कर्तुत्व सिध्द करून दाखवलं आहे.

ST महामंडळाची नोकरी सांभाळून केली प्रयोगशील शेती

सत्यपाल गुजर हे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील अर्थे खुर्द येथील युवा शेतकरी आहेत. ते महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची नोकरी सांभाळून गावी असलेल्या वडिलोपार्जित शेतीत आधुनिक पद्धतीने शेती करतात. त्यांनी केळीची आधुनिक पद्धतीने शेती केली आहे. गेल्या (Farmer Success Story) पाच वर्षात आपल्या शेतीकडे प्रयोगशीलतेच्या दृष्टीनं पाहणाऱ्या सत्यपाल गुजर यांनी एप्रिल महिन्यात केळी लागवड केली होती. तेव्हापासून केळी व्यवस्थापन करुन अवघ्या नवव्या महिन्यात आपल्या शेतातील केळी परिपक्व केली आहे. आता त्यांची केळी आखाती देशांमध्ये म्हणजेच इराणमध्ये निर्यात होते. या केळीच्या माध्यमातून देशाला परकीय चलन प्राप्त होत आहे. तसेच त्यांना केली उत्पादणातून चांगला फायदा होत आहे.

क्विंटलला केळीचा दर तब्बल 3 हजार 31 रुपये

सत्यपाल गुजर यांनी एप्रिल 2022 मध्ये अजित सीड कंपनीचे G-9 हे केळीचे उती संवर्धित रोप शेतीत लागवड केले. सध्या त्यांची केळी इराणमध्ये निर्यात केली जाते. या कामात त्यांना वितरण व्यवस्थापक गुणवंत मोरे आणि संचालक बलराम राजपूत व्यवस्थापकीय संचालक (Farmer Success Story) निलेश राजपूत यांची मदत झाली. सध्या त्यांची दोन एकर केळी आहे. पहिल्याच खेपेत त्यांनी 12 टन केळी इराणमध्ये निर्यात केली आहे. यावेळी आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट भाव केळी पिकाला मिळाला असून 3 हजार 31 रुपये क्विंटल दराने केळी निर्यात केली आहे. निर्यातक्षम केळी आपल्या गावातून निर्यात होऊ शकते हे युवा शेतकऱ्याने सिद्ध केले आहे. परिसरातील युवा शेतकरी सत्यपाल गुजर यांच्या लागवड केलेल्या केळी शेताला भेट देत आहेत.

टिशू कल्चरचा प्रयोग यशस्वी ठरला

टिशू कल्चर ने तयार करण्यात आलेल्या या रोपांमुळे केळीचे पीक जोमदार बहरलं आहे. एप्रिल मध्ये लागवड केली आणि नऊ महिन्यात यापासून त्यांना उत्पादन मिळाले. विशेष म्हणजे त्यांनी उत्पादित केलेली केळी आखाती देशांमध्ये निर्यात झाली. आखाती देश इराण मध्ये थेट धुळ्याची केळी निर्यात झाली असल्याने पंचक्रोशीत त्यांचा हा प्रयोग गाजत आहे.

त्यांनी आपल्या दोन एकर शेत जमिनीत केळी लागवडीचा प्रयोग केला असून 12 टन एवढे उत्पादन पहिल्या खेपेत घेतले आहे. आणि याची थेट निर्यात निर्यातदारांच्या माध्यमातून इराणला झाली आहे. विशेष म्हणजे तीन हजार 31 रुपये प्रति क्विंटल दराने त्यांच्या केळीला भाव मिळाला आहे. निश्चितच सत्यपाल यांनी नोकरी सांभाळत शेतीमध्ये मिळवलेलं हे यश इतरांसाठी प्रेरक ठरत आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com