Exam Fever : UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी मोबाईल App लाँच; असं करा Download

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी खूशखबर (Exam Fever) आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने एक Android मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च केले आहे. हे App विद्यार्थ्यांना UPSC परीक्षा आणि भरतीशी संबंधित माहिती प्रदान करेल. UPSC App अँड्रॉइड फोनसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे आणि ते Google Play store वरून डाउनलोड करता येणे शक्य आहे.

अधिकृत निवेदनानुसार, केंद्रीय लोकसेवा आयोगाने गुगल प्लेस्टोअरवर UPSC अँड्रॉइड अॅप सादर केले आहे, ज्याद्वारे परीक्षा आणि भरतीशी संबंधित सर्व माहिती मोबाईलवर मिळू शकते. मात्र हे अॅप मोबाईलवर अर्ज भरण्याची आणि सबमिट करण्याची सुविधा देणार नाही.

UPSC परीक्षेचे 3 टप्पे (Exam Fever)

UPSC केंद्र सरकारच्या नोकऱ्यांसाठी प्रतिष्ठित नागरी सेवा परीक्षेसह अनेक परीक्षा घेते. दरवर्षी हजारो उमेदवार या परीक्षांसाठी अर्ज करतात. भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय विदेश सेवा (IFS) आणि भारतीय पोलीस सेवा (IPS) साठी अधिकारी निवडण्यासाठी नागरी सेवा परीक्षा दरवर्षी तीन टप्प्यांत म्हणजेच पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या स्वरूपात घेतली जाते.

या चुका करू नका

तुम्ही जर एकदा UPSC परीक्षेला बसला असाल तर तुम्हाला पेपर आणि इतर गोष्टींची कल्पना आली असेल. त्यामुळे आता तुमच्या चुकांमधून धडा घ्या आणि त्यांची पुनरावृत्ती (Exam Fever) करणे टाळा. मॉक टेस्ट मध्ये झालेल्या चुकांकडे विशेष लक्ष द्या. जर तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकलात तर पुन्हा ती चूक तुमच्याकडून कधीच होणार नाही.

Current Affairs कडे विशेष लक्ष द्या

सिव्हिल सर्व्हिस परीक्षेत Current Affairs विषयी माहिती खूप उपयुक्त ठरते. त्यामुळे रोज वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावून घेणं महत्वाचं आहे. वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध होणारा संपादकीय स्तंभ तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com