Employment : राज्यात होणार भली मोठी गुंतवणूक!! तब्बल 2 लाख नोकऱ्या निर्माण होणार; मुख्यमंत्र्यांची महत्वाची माहिती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन |  गेल्या वर्षभरापासून सत्ताधारी आणि (Employment) विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. याचं कारण आहे महाराष्ट्रात होणारी गुंतवणूक.  महायुतीकाळात महाविकास आघाडीपेक्षा जास्त गुंतवणूक केल्याचा दावा सत्ताधारी करत होते. अशातच आता स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषद सुरु झाली आहे. या परिषदेत दोन दिवसांत महाराष्ट्राने ३ लाख १० हजार ८५० कोटीचे सामंजस्य करार केले आहेत. तसेच ४२ हजार ८२५ कोटींचे करार होणार आहेत. यामुळे राज्यात ३ लाख ५३ हजार ६७५ लाख कोटींची विक्रमी गुंतवणूक होणार आहे; अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच १ लाख कोटींच्या गुंतवणुकीत उद्योगांनी स्वारस्य दाखवले असल्याचे त्यांनी सांगितले. या गुंतवणुकीमुळे राज्यात २ लाख रोजगार निर्मिती होणार आहे; त्यामुळे ही बातमी राज्यातील तरुणांना मोठा दिलासा देणारी ठरणार आहे.

दावोस परिषदेत ६ उद्योगांसमवेत १ लाख २ हजार कोटींच्या (Employment) गुंतवणुकीचे करार करण्यात आले आहेत. यामाध्यमातून २६ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. १७ जानेवारीस ८ उद्योगांशी २ लाख ८ हजार ८५० कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आले. त्यातून १ लाख ५१ हजार ९०० रोजगार निर्मिती होईल. १८ जानेवारी रोजी ६ उद्योगांशी ४२ हजार ८२५ कोटींचे करार होत असून त्यातून १३ हजार रोजगार निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तसेच विविध उद्योगांनी १ लाख कोटींचे गुंतवणूक स्वारस्य दाखविले आहे. यात अर्सेलर निपॉन मित्तल तसेच सौदी, अरब, ओमान येथील उद्योगांचा समावेश आहे.

उद्योगांची माहिती, गुंतवणूक आणि रोजगार संख्या अशी आहे – (Employment)
1. आयनॉक्स एअर प्रोडक्ट – २५ हजार कोटी – ५ हजार रोजगार
2. बी. सी. जिंदाल -४१ हजार कोटी- ५ हजार रोजगार
3. जेएसडब्ल्यू स्टील -२५ हजार कोटी- १५ हजार रोजगार
4. एबी इन बेव्ह -६०० कोटी- १५० रोजगार
5. गोदरेज एग्रोव्हेट – १००० कोटी-६५० रोजगार
6. अमेरिका स्थित डेटा कंपनी – १० हजार कोटी – २०० रोजगार
7. अदानी ग्रुप – ५० हजार कोटी -५०० रोजगार
8. स्विस इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स – ११५८ कोटी – ५०० रोजगार
9. इंडियन ज्वेलरी पार्क – ५० हजार कोटी – १ लाख रोजगार
10. वेब वर्क्स – ५ह्जार कोटी – १०० रोजगार (Employment)
11. लॉजिस्टिकमधील इंडोस्पेस, इएसआर, केएसएच, प्रगती, यांची मिळून – ३५०० कोटी – १५ हजार रोजगार)
12. नैसर्गिक संसाधानातील कॉन्गलोमिरेट कंपनी – २० हजार कोटी – ४ हजार रोजगार
13. सुरजागड इस्पात – १० हजार कोटी – ५ हजार रोजगार
14. कालिका स्टील – ९०० कोटी – ८०० रोजगार
15. मिलियन स्टील – २५० कोटी – ३०० रोजगार
16. ह्युंदाई मोटर्स – ७ हजार कोटी – ४ हजार रोजगार
17. कतारची एएलयु टेक समवेत – २०७५ कोटी-४०० रोजगार
18. सीटीआरएल एस – ८६०० कोटी – २५०० रोजगार
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com