Education Loan : एज्युकेशन लोन घ्यायचंय? जाणून घ्या… काय असते पात्रता; कोणती कागदपत्रे आहेत आवश्यक?

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण घेताना अनेक वेळा अशी (Education Loan) परिस्थिती उद्भवते की उच्च शिक्षण घेण्याच्या मार्गात आर्थिक समस्या निर्माण होतात. अनेकांमध्ये शिकण्याची जिद्द असते; पण भरमसाठ फी भरण्यासाठी विद्यार्थ्यांकडे पुरेसे पैसे नसतात. अशावेळी कधीकधी त्यांना स्वप्नांचा बळी द्यावा लागतो. या परिस्थितीत शैक्षणिक कर्ज घेणे खूप उपयुक्त ठरते. त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत…

वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन यासह इतर अभ्यासक्रमांसाठी बँकेकडून मिळालेल्या या कर्जामुळे फी भरण्याच्या समस्येपासून विद्यार्थ्यांना बऱ्याच अंशी दिलासा मिळतो. परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्नही या मदतीने साकार होऊ शकते. आता तुम्हीही या दिशेने विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जर तुम्हाला शैक्षणिक कर्ज (Education Loan) घ्यायचे असेल तर तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतील याविषयी…

एज्युकेशन लोनसाठी ‘ही’ कागदपत्रे आहेत महत्वाची
1. 10वी, 12वीची मार्कशीट
2. बँक पासबुक
3. उत्पन्नाचा दाखला (Education Loan)
4. ओळखीचा पुरावा (पासपोर्ट/ड्रायव्हिंग/मतदार आयडी)
5. प्रवेश परीक्षेचा निकाल
6. ज्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा पास झाली आहे त्याचा पुरावा
7. वयाचा पुरावा
8. विद्यार्थी आणि पालक दोघांच्या आधार कार्डसह इतर कागदपत्रे आवश्यक
(यासोबतच अर्जदाराने पूर्वीचे कर्ज घेतले आहे का, हेही तपासले जाते.)

शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी आवश्यक पात्रता (Education Loan)
1. शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करणारे उमेदवार देशाचे नागरिक असणे आवश्यक आहे.
2. अर्जदाराचा शैक्षणिक रेकॉर्ड चांगला असावा.
3. अर्जदार ज्या कोर्ससाठी अर्ज करू इच्छितो त्याची रोजगारक्षमता, टक्केवारी किती आहे; या बाबी आणि इतर अनेक गोष्टींचा विचार केल्यानंतर विद्यार्थी या कर्जासाठी पात्र ठरतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com