करिअरनामा ऑनलाईन । भारतीय विद्यार्थ्यांना फ्रान्समध्ये (Education in France for Indian Students) शिक्षणासाठी केवळ मेरिट आणि प्रोत्साहन याच गोष्टी महत्वाच्या आहेत. विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती कशी आहे, हे त्यांना व्हिसा मिळवण्यासाठी महत्वाचं नाही; अशी महत्वाची माहिती फ्रान्सचे काऊन्सिल जनरल जीन मार्क सेरे चार्टेल यांनी दिली आहे. ते पुण्यात बोलत होते. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना फ्रान्समध्ये शिक्षण घेणं सोप्पं झालं आहे.
फ्रान्समध्ये कर्जाच्या ओझ्याशिवाय नोकऱ्या आहेत सहज उपलब्ध
चार्टेल पुढे म्हणाले; जगभरातील अनेक आघाडीची विद्यापीठे फ्रान्समध्ये आहेत. तिथल्या सरकारनं शिक्षणावर दिलेल्या अनुदानीत व्यवस्थेमुळं विद्यार्थ्यांना कुठल्याही मोठ्या कर्जाच्या ओझ्याशिवाय नोकऱ्याही सहज उपलब्ध होत आहेत. अशी शैक्षणिक कर्जे घेऊन त्यांना आयुष्यभर ती फेडत बसण्याची गरज नाही.
३०,००० विद्यार्थी फ्रान्समध्ये शिक्षणासाठी येतील (Education in France for Indian Students)
चार्टेल यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांनी केलेल्या विधानाचा पुनरुच्चार करताना म्हटलं आहे की, २०३० पर्यंत ३०,००० विद्यार्थी फ्रान्समध्ये शिक्षणासाठी येतील अशी अपेक्षा आहे. सध्या विद्यार्थ्यांची ही संख्या ८००० इतकी आहे. फ्रान्स सरकार सध्या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशीप्स आणि एक्स्चेंज प्रोग्रामवर काम करत आहे; असंही त्यांनी सांगितलं.
फ्रेन्च बोलता येत नसेल तरी चालेल
२० वर्षांपूर्वी फ्रान्समध्ये इंग्रजीचं पुरेस ज्ञान नव्हतं. आता फ्रान्समधील प्राध्यापक आणि कर्मचारी स्वतःला फ्रेन्चऐवजी इंग्रजी भाषेत चांगल्याप्रकारे व्यक्त होत आहेत. फ्रान्समध्ये (Education in France for Indian Students) आता इंग्रजी शिकवणं हे खूपच सामान्य झालं आहे. त्यामुळं भारतीयांना आता फ्रेन्च भाषा येत नसेल तरी ते फ्रान्समध्ये चांगल्याप्रकारे संवाद साधू शकतात.
‘मल्टिपल एन्ट्री शॉर्ट स्टे व्हिसा’
फ्रान्समध्ये सध्या कोणत्याही परदेशी विद्यार्थ्यासाठी पाच वर्षांसाठी ‘मल्टिपल एन्ट्री शॉर्ट स्टे व्हिसा’ दिला जातो. या विद्यार्थ्यांना फक्त कमीत कमी एका सेमिस्टरची फी (बॅचलर किंवा मास्टर्स) भरावी लागेल. एक्स्चेंज प्रोग्रामासाठीही हा नियम लागू आहे, असंही काऊन्सिल जनरल चार्टेल यांनी सांगितलं.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com